नाशिक

जुलैमधील अतिवृष्टीने 5,586 शेतकर्‍यांचे नुकसान

3,070 हेक्टर क्षेत्र बाधित; 286.48 लाखांची मदत अपेक्षित

नाशिक : प्रतिनिधी
जुलैमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अंतिम संयुक्त स्वाक्षरी अहवालातून नुकसानीची व्याप्ती स्पष्ट झाली आहे. जिल्ह्यातील 114 गावांमधील तब्बल पाच हजार 586 शेतकरी बाधित झाले आहेत. तीन हजार 70.83 हेक्टर क्षेत्रावरील पिके व फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाकडून 286.48 लाख रुपये म्हणजेच दोन कोटी 86 लाख 48 हजारांची मदत अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्रापैकी सुमारे 97 टक्के क्षेत्र एकट्या निफाड तालुक्यातील आहे.
निफाड तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. तालुक्यातील 69 गावांमधील पाच हजार 345 शेतकर्‍यांचे दोन हजार 982.35 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी 278.76 लाखांंची मदत अपेक्षित आहे.
निफाडपाठोपाठ इगतपुरी तालुक्यातील पाच गावांमधील 62 शेतकर्‍यांचे 31.34 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 2.66 लाख रुपये मदत अपेक्षित आहे. सुरगाणा तालुक्यातील 20 गावांमधील 82 शेतकर्‍यांचे 25.86 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 2.23 लाखांंची मदत अपेक्षित आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात 10 गावांतील 68 शेतकर्‍यांचे 20.08 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 1.74 लाख रुपये मदत अपेक्षित आहे.
कळवण तालुक्यातील आठ गावांमधील 17 शेतकर्‍यांचे 5.90 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 0.64 लाख, तर देवळा तालुक्यातील दोन गावांमधील 12 शेतकर्‍यांचे 5.30 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 0.45 लाख मदत अपेक्षित आहे.

सोयाबीनला सर्वाधिक फटका
अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम कोरडवाहू पिकांवर झाला आहे. यात सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार 773.52 हेक्टर कोरडवाहू क्षेत्र बाधित झाले आहे. त्यासाठी 235.75 लाख मदत अपेक्षित आहे. यात सोयाबीनचे दोन हजार 539.12 हेक्टर, मक्याचे 157.48 हेक्टर, भात 75.94 हेक्टर, भुईमूग 0.32 हेक्टर आणि इतर पिकांचे 0.66 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. नऊ तालुक्यांत 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान नाही. मालेगाव, सटाणा, नांदगाव, दिंडोरी, नाशिक, पेठ, सिन्नर, चांदवड आणि येवला या तालुक्यांत अंतिम अहवालानुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झाल्याची नोंद नाही. त्यामुळे या तालुक्यांचा नुकसानभरपाईच्या अंतिम आकडेवारीत समावेश झालेला नाही.

शासन निर्णयानुसार मदतीची गणना
27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार कोरडवाहू पिकांसाठी आठ हजार 500 रुपये प्रतिहेक्टर, बागायती पिकांसाठी 17 हजार रुपये प्रतिहेक्टर, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी 22 हजार 500 रुपये प्रतिहेक्टर या दराने मदतीची गणना करण्यात आली आहे. तालुकास्तरावरून प्राप्त झालेल्या संयुक्त स्वाक्षरी अहवालांच्या आधारे जिल्ह्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. तो पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे.

तालुकानिहाय नुकसान
तालुका              बाधित गावे    बाधित शेतकरी   बाधित क्षेत्र    अपेक्षित मदत
कळवण                   8                   17                  5.90 हे.              64 लाख
देवळा                     2                     12                 5.30 हे.             45 लाख
सुरगाणा                20                   82                25.86 हे.           2.23 लाख
त्र्यंबकेश्वर             10                   68                20.08 हे.           1.74 लाख
इगतपुरी                5                     62                 31.34 हे.            2.66 लाख
निफाड                  69                   5,345           2,982.35 हे.       278.76 लाख
एकूण                    114                 5,586           3,070.83 हे.       286.48 लाख

5,586 farmers suffered losses due to heavy rainfall in July.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

11 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

11 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

11 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

11 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

11 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

11 hours ago