नाशिक

यंदाच्या नवरात्रोत्सवात 594 चारचाकींची जास्त विक्री

आरटीओला 23 कोटी 23 लाख महसूल प्राप्त; तीन हजार 644 नव्या वाहनांची नोंद

पंचवटी : सुनील बुनगे
सण-उत्सवादरम्यान नागरिकांकडून घर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी अन् वाहनांच्या खरेदीला पसंती दिली जाते. या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल बाजारपेठेत होत असते. यंदा नवरात्रोत्सव दि. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुमारे तीन हजार 644 नव्या वाहनांची नोंद झाली आहे. त्या माध्यमातून 23 कोटी 23 लाख 57 हजार 489 रुपयांचा महसूल आरटीओला मिळाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत तीन कोटी 76 लाख 69 हजार 538 रुपयांचा अतिरिक्त महसूल जास्त मिळाला आहे. दरम्यान, यंदा 298 नव्या वाहनांची नोंद झाली आहे. चारचाकींची 594 ने जास्त विक्री झाली आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणांना महत्त्व असते. विशेषतः गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून ते दसर्‍यापर्यंत तसेच दिवाळीत लक्ष्मीपूजन अशा सणांना अनेक नागरिक काही ना काही खरेदी करत असतात. यात फ्लॅट, व्यावसायिक गाळे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, चांदी याबरोबर दुचाकी, चारचाकी वाहन आदी नवीन वस्तूंना प्राधान्य देतात. यामुळे बाजारपेठेतसुद्धा कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. सण- उत्सवापूर्वी वाहनांचे बुकिंग केले जाते आणि मुहूर्त बघून वाहन घरी घेऊन जातात. प्रादेशिक परिवहन कार्यालयात यावेळी नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासून ते दसर्‍यापर्यंत एक हजार 609 दुचाकी, तर एक हजार 596 नव्या चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे.
ट्रॅक्टर (34), बस (4), बांधकाम उपकरणे वाहन (2), क्रेन बसवलेले (1), डम्पर (7), उत्खनन करणारा (एनटी) (4) गुड्स कॅरियर (265), हार्वेस्टर (2), मोटारसायकल/स्कूटर (एक हजार 609), मोपेड (6), मोटार कॅब (40), चारचाकी कार (एक हजार 596) , थ्री व्हीलर (गुड्स कॅरियर) (4) प्रवासी रिक्षा (69), जनरेटर व्हॅन (01), अशा प्रकारे नवीन वाहनांची नोंद झाली आहे.

तीन कोटी 76 लाखांचा जास्त महसूल

सन 2024 मध्ये प्रादेशिक परिवहन विभागाला 19 कोटी 46 लाख 87 हजार 952 रुपयांचा महसूल मिळाला होता. तीन हजार 346 नव्या वाहनांची नोंद झाली होती. यावर्षी (2025) 23 कोटी 23 लाख 57 हजार 489 रुपयांचा महसूल मिळाला असून, तीन हजार 644 नव्या वाहनांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन कोटी 76 लाख 69 हजार 538 महसुलात वाढ झाली आहे.

चारचाकी वाहनांना वाढली मागणी

यावर्षी तीन हजार 644 नव्या वाहनांची नोंद झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत 298 जास्त वाहनांची नोंद झाली आहे. यात विशेषतः चारचाकी वाहनांची नोंद झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत 594 नव्या चारचाकी वाढल्या आहेत. दुचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र 192 ने घट झाली आहे. डंपर सातने घटले आहेत. प्रवासी रिक्षा दहाने, तर गुड्स करियर थ्री-व्हीलर दहाने घटल्या आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी काहीसा घटल्यानेदेेखील चारचाकी वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते.व्यावसायिक वाहनांना पूर्वी एकरकमी कर होता; परंतु 1 जुलैपासून या वाहनांचा एकरकमी कर कमी करून त्यांचा रोड टॅक्स वाढल्याने त्या माध्यमातून करात वाढ झाल्याने महसुलात वाढ झाली आहे.

 

Editorial Team

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago