सिडको : विशेष प्रतिनिधी
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 60 लाख रुपयांची फसवणूक करणार्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने रायगड जिल्ह्यातून अटक केली. युवराज सुरेश जानवलकर (वय 32) आणि यश सुरेश जानवलकर (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी ‘फ्युचर स्टॉक मार्केट अॅनालिसेस’ नावाची गुंतवणूक संस्था असल्याचे भासवून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून सुमारे 60 लाख रुपये उकळल्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 18 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने गुन्हे शाखा युनिट-2 चे पथक त्यांचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रायगड जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक रायगड येथे रवाना झाले. खोपोली परिसरातून युवराज जानवलकर तर नेरूळ परिसरातून यश जानवलकर यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी आणि पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
60 lakhs fraud with the lure of stock market investment
15 जूनपर्यंत पेरण्या न करण्याचे शेतकर्यांना आवाहन मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. तळकोकणाच्या…
नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता खर्च आणि पश्चिम आशियातील तणावाचे कारण देत तेल…
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…