अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती
नाशिक : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस (ई-बस) उपलब्ध झाल्या आहेत. सिटीलिंकमार्फत शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि प्रवाशांसाठी आरामदायी करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने या ई-बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येत आहेत. दरम्यान, या बसेससाठी सिटीलिंकच्या नियमित बसप्रमाणेच भाडे लागणार असून, स्वतंत्र पासची आवश्यकता लागणार नाही, असे सिटीलिंक प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे.
सद्यःस्थितीत 11 ई-बसेस नाशिककर प्रवाशांच्या सेवेत सुरू झाल्या आहेत. सिटीलिंकच्या या ई-बसेस वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वातानुकूलित बस असल्यामुळे तिचे प्रवासभाडे सीएनजी बसपेक्षा अधिक असेल, असा गैरसमज प्रवाशांत होण्याची शक्यता आहे. मात्र, ई-बस वातानुकूलित असली, तरी तिचे प्रवासभाडे सीएनजी बसइतकेच आहे. सीएनजी बस आणि इलेक्ट्रिक बस यांचे भाडे समान ठेवण्यात आले असून, वातानुकूलित सुविधेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत नाही, अथवा स्वतंत्र भाडेवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना सीएनजी बसच्या समान भाड्यात वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक बससेवेचा लाभ घेता येणार आहे. सिटीलिंकमार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी वितरित करण्यात येणारे सीएनजी बसचे पास ई-बस प्रवासासाठीदेखील वैध राहणार आहेत. त्यामुळे ज्या प्रवाशांकडे सध्या सीएनजी बससाठीचे वैध पास आहेत, त्यांना त्याच पासच्या आधारे ई-बसनेही प्रवास करता येणार आहे. ई-बस प्रवासासाठी स्वतंत्र पास काढण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. यामुळे नियमित प्रवास करणार्या विद्यार्थी, नोकरदार तसेच इतर पासधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वातानुकूलित ई-बसच्या भाड्याबाबत किंवा पास सुविधेबाबत कोणताही गैरसमज करून न घेता, सीएनजी बसइतक्याच भाड्यात वातानुकूलित ई-बस प्रवासाचा लाभ घ्यावा. तसेच सध्या वापरात असलेल्या वैध सीएनजी बस पासचाच ई-बस प्रवासासाठी उपयोग करावा. नाशिककर नागरिकांनी सिटीलिंकच्या ई-बस सेवेला प्राधान्य देऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सिटीलिंकने केले आहे.
A separate pass is not required for electric buses.
सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…
महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…
ऊसतोड कामगारांचे हाल; बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव शक्य निफाड : तालुका प्रतिनिधी उन्हाच्या तीव्रतेनंतर अवघ्या…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात ग्रामपंचायत क्षेत्रात 1,159, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात 18 ठिकाणी नवीन आपले…
अंबड लिंकरोडवर चौघांनी केली मारहाण सिडको : प्रतिनिधी वाहन बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अशोक…
पंचवटी : प्रतिनिधी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे दुचाकी वाहनांसाठी (एमएच 15-एलडी) ही नवीन मालिका…