नाशिक : प्रतिनिधी
पितृपक्षानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नवरात्रीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, सर्वत्र आनंदाचे उधाण आले आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही सजल्या आहेत. दरवर्षी नवनवीन डिझाइन आणि प्रकारांमध्ये घागरे, लेहेंगा, मुलांचे धोती, जॅकेटसह दागिन्यांची विविध अॅक्सेसरीज भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बुकिंगला सुरवात झाल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वषार्ंपासून भव्य स्वरूपात नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जात आहे. नवरात्री आणि गरबा, दांडिया हे समीकरणच आहे. परिणामी नवरात्रीचा इव्हेंट करण्यावर आयोजकांचा भर असतो. नवरात्रीतील या नऊ दिवसांत देवीसमोर दांडिया खेळला जातो.
गरबा नाइट्ससाठी तरुणाईला हटके दिसायचे असते. त्यामुळे आपले डिझाइन किंवा रंग कॉपी होऊ नये याची दक्षता घेत निवडून घागरे, चनिया चोली आणि ज्वेलरी भाडेतत्त्वावर घेतले जात आहे. त्यासाठी बुकिंग सुरू झाल्याचे कला दि डिझायनरच्या संचालिका वृषाली माहेगावकर यांनी सांगितले.
यंदा गरब्यासाठी विविध कलाकुसर केलेले घागरे उपलब्ध आहेत. कपलसाठी रिव्हर्स घागर्याचे प्रकार असून, ब्रॉकेड घागरा त्यावर मिरर वर्क, कवडी वर्क केलेल्या लेहेंग्याना मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी शॉर्ट घागर्यांना मागणी होती. यंदा लाँग आणि जास्त घेर असलेल्या घागर्यांना मागणी आहे. तीन वषार्ंच्या मुला-मुलींपासून ते स्त्री-पुरुषांपर्यत 300 ते एक हजारांपर्यंत एक दिवसाचे भाडे आकारले जाते. त्यावर ज्वेलरी मोफत दिली जाते. काही ठिकाणी किरकोळ दराने भाडेतत्त्वावर ती दिली जातेे.
फॅशन दरवर्षी बदलत असल्याने कायमस्वरूपी घागरे घेण्याबद्दल अनेकांचा नकार असतो. त्यामुळे भाडेतत्त्वावर घागरे घेत सणाचा आनंद आणि फॅशनही फॉलो केल्याचे समाधान मिळते. त्यामुळे दरवर्षी घागरे भाडेतत्त्वावर घेतले जातात. लहान मुलांच्या खास फर गरबा कलेक्शनला पालकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. यंदाच्या नवरात्रीत पेस्टल रंगाचे फर आणि कच्छी वर्क असलेले ड्रेस गरबा मैदानावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील, यात शंका नाही.
– वृषाली माहेगावकर, कला द डिझायनर
ज्वेलरीचे प्रकार
कमरपट्ट्यात विविध प्रकार उपलब्ध आहेत. नवरंगांचा गोंडा असलेले लटकन असलेल्या ज्वेलरीला विशेष मागणी आहे. इंडोवेस्टर्न दागिन्यांना मागणी असून, गळ्यातील हसली, हातातील कडे, दंडात घालण्याचे दागिने, माथा बिंदी, बांगड्या, पायातील ज्वेलरी, गळ्यातील मोठमोठे ऑक्सडाइज शॉर्ट, लाँग हार, माळा, कडे, बिंदी, आम्रपाली कमरपट्टा, बाजुबंद, कापडी ब्रेसलेट, कानातले, तोडे आदी उपलग्ध आहे. काही जण ज्वेलरी कायमस्वरूपी खरेदी करून ठेवतात. घागर्यामध्ये नवीन प्रकारातील हेवी वर्क टिकली, गोंडा, लेसवर्क, मिरर, कुंदन, गोटावर्क आदी प्रकार उपलब्ध आहेत. इंडोवेस्टर्न धोती, जॅकेट या प्रकारांना मुलांकडून पसंती दिली जात आहे.
यंदा सिल्क व कॉटनसोबतच व्हेलव्हेट फॅब्रिकला पसंती
डबल घेर घागरा डान्समध्ये परफेक्ट फ्लेअर
यंदा डबल घेर घागरा बाजारात धुमाकूळ घालत आहे. दोन थरांत डिझाइन केलेल्या या घागर्याला प्रचंड घेर असतो.
मोर थीम घागरा
मयूराच्या पिसांचे सुंदर रंग जसे की, मोरपंखी निळा, हिरवा आणि सोनेरी रंग घागर्यावर पाहायला मिळत आहे.
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि फ्यूजन
या नवीन ट्रेंड्ससोबतच तरुणी मोठ्या आकाराचे कानातले, चोकर आणि कमरपट्ट्या यांसारख्या ऑक्सिडाइज्ड दागिन्यांना प्राधान्य देत आहेत.
केडिया, कच्छी वर्क आणि फरची क्रेझ
मुलांसाठी यंदा बाजारात पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा एक अनोखा फ्युजन लूक सादर करण्यात आला आहे. या डिझाइन्सचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, लहान मुलांच्या गरबा ड्रेसच्या बॉर्डरला आणि गळ्याला लावलेली फर. यामुळे कपड्यांना एक अतिशय स्टायलिश आणि क्यूट लूक मिळाला आहे. खेळताना किंवा गरबा करताना मुलांना कोणतीही अडचण येऊ नये आणि ते गर्दीत उठून दिसावेत, यासाठी मऊ कपड्यांचा वापर करून हे विशेष ड्रेस तयार करण्यात आले आहेत.
असे आहेत दर (भाडेतत्त्वावर)
मुलींसाठी घागरा
♦ एक दिवसासाठी 300 ते 1000 रु.
♦ नऊ दिवसांसाठी 350 ते 800 रु.
मुलांसाठी
♦ धोती, जॅकेट 300 ते 700 रु.
♦ नऊ दिवसांसाठी 350 ते 800 रु.
♦ कपल सेट 1800 रु.
♦ लहान मुलांचे 350 ते 500 रु.
Preference for renting readymade lehengas during the Navratri festival.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…