महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावे वगळली

रोहिणी खडसेंचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारची’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या योजनेवरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे. यावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, की निवडणुकीच्या काळात याच सरकारने महिलांना लाडक्या बहिणी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे मोठे दावे केले होते. पण, आता निवडणूक संपताच सरकारमधीलच जबाबदार मंत्री आणि नेते या योजनेचा खर्च वाढल्याचे सांगत आहेत. निवडणुकीपुरत्या लाडक्या राहिलेल्या या बहिणींचा खर्च आता सरकारला जड वाटू लागला आहे का? असा सवाल त्यांनी केला.
रोहिणी खडसे यांनी थेट आकडेवारी जाहीर करत सरकारला घेरले. प्रशासनाकडून विविध तांत्रिक त्रुटी आणि निकषांचे कारण पुढे करत तब्बल 92 लाख पात्र-अपात्र महिलांची नावे या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. ही मोठी कपात म्हणजे राज्यातील लाखो गरजू महिलांची फसवणूक असल्याचे सांगत, सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवावे आणि महिलांना त्यांचे हक्क द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीनंतरही ’लाडकी बहीण’ योजनेच्या निधीवरून आणि वाटपावरून विरोधक सातत्याने आक्रमक पवित्रा घेत आहेत. आज 92 लाख नावे वगळल्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी 80 लाखांपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी 12 लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आले आहे. असं करून सरकारने तब्बल 92 लाख महिलांना अपात्र केलं आहे. सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च 26 हजार 197.78 कोटींवरवरून 33 हजार 697 कोटींवर गेला आहे. लाडक्या बहिणींवर 7500 कोटींचा खर्च वाढला आहे, असे ट्विट त्यांनी केले.

9.2 million names excluded from the ‘Ladki Bahin’ scheme.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

23 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

23 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

23 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 hours ago