महाराष्ट्र

वारकर्‍यांच्या दिंडीला अपघात, तीन महिलांचा मृत्यू

पुणे/सांगली : प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांच्या दिंडीला सासवड-जेजुरी मार्गावर एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तीन महिला वारकर्‍यांचा मृत्यू झाला असून, इतर तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
कसबे डिग्रज येथून 6 जुलै रोजी दीडशेहून अधिक वारकर्‍यांसह निघालेल्या या दिंडीवर प्रवासाच्या पाचव्या दिवशीच काळाने हा आघात केला.
या अपघातात नंदा पवार (वय 60, रा. कसबे डिग्रज), माधवी राजाराम सलगरे (वय 55, रा. मालगाव) आणि राजश्री शंकर भोसले (वय 55, रा. कवलापूर) या महिलांनी प्राण गमावले आहेत. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच कसबे डिग्रज, मालगाव आणि कवलापूर या तिन्ही गावांवर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून मृत वारकरी महिलांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मदत
अपघाताचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत अपघातग्रस्त आणि जखमी वारकर्‍यांची भेट घेतली. या वेदनादायी घटनेबाबत दुःख व्यक्त करत त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली, तसेच जखमी वारकर्‍यांवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे निर्देश संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले. पंढरपूरकडे जाणार्‍या वारकर्‍यांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, वाहनचालकांनी वारी मार्गावर अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Accident involving Warkari procession; three women killed.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

22 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

22 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

22 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

22 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

23 hours ago