वर्धा येथे होणार ९ ६ वे मराठी साहित्य संमेलन

 

नागपूर : आगामी ९ ६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे . याबाबतची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी काल ना गपुरातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली . अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक काल नागपुरात पार पडली . या बैठकीत आगामी संमेलन विदर्भात घेण्याचा निर्णय घेण्यात आला .

हेही वाचा : वृद्ध साहित्यिक कलावंतांना मिळणार मानधन

साहित्य संमेलन दरम्यान , काल महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला तिथले मैदान आणि वाहनतळाची पाहणी करण्यासाठी गेले होते . या समितीने सदर जागा योग्य असल्याचे पाहून वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली होती .

 

हेही वाचा : 95 वे साहित्य संमेलन : अबालवृद्धांच्या सहभागाने ग्रंथदिंडी फुलली

त्या शिफारशीनुसार आता अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचे निश्चित केले आहे . मात्र , या संमेलनाच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *