राजेंबद्दल आदर कमी होणार नाही: भुजबळ

नाशिक : प्रतिनिधी
छत्रपती घराणे महाराष्ट्रात सर्वांना प्रिय आहे. खासदार असले काय, नसले काय, त्यांच्याबद्दलचा आदर जनमाणसात कोठेही कमी होणार नाही, असे छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संभाजीराजे भोसले यांना राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये फसवले आहे, असा गंभीर आरोप केला जात आहे.

हेही वाचा : नाशिक शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास साधावा :पालकमंत्री छगन भुजबळ

या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्रकारांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना भाजपाने देखील संभाजीराजेंचा गेम केला का?असा प्रश्न विचारला. यावर छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजेंच्या वडिलांनी सविस्तर चर्चा केली आहे. कुठेही आमच्या घराण्याचा अपमान झाला नाही. यात मुख्यमंत्र्यांसह कोणाची चूक नाही, असे सांगितल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा: भाजपामुळे देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले छगन भुजबळ यांची टीका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *