रावळगाव एस.जे.शुगरच्या तत्कालीन संचालकांना ऊस तोड वाहतुकदारांचा घेराव

रावळगाव एस.जे.शुगर च्या तत्कालीन संचालकांना ऊस तोड वाहतुकदारांचा घेराव

मालेगाव: प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील एस.जे. शुगर
येथे कारखान्याच्या आवारात तत्कालीन संचालक मिरा धाडेगावकर यांच्या वाहनाला घेराव घालत २०२० ते २०२१ सालातील थकीत तोडवाहतुकीच्या रक्कम अदा करण्यात यावीत किंवा तात्काळ धनादेश अदा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

कारखाना विक्री झाल्यानंतर कारखाना आवारात आयोजीत मशिनरी पूजन तसेच शेतकरी संवाद मेळाव्यात एस.जे. शुगरच्या तत्कालीन मिरा धाडेगावकर आल्या आहेत. यावेळी परतीच्या मार्गावर निघत असताना थकित रकमेची मागणी केली. यामध्ये चाळीसगाव, अमळनेर चोपडा, वैजापूर या तालुक्यातील तोडवाहतुकदार उपस्थित होते. तोडवाहतुकदार विजय सुरेश देशमुख अशोक पाटिल, अशोक तिरमलिक कैलास कदम, किशोर महाजन, संदीप रौंदळ, धनसिंग रामसिंग महाले, जितेंद्र पाटील यांचा समावेश आहे याच्यासमवेत ऊस उत्पादक बाळासाहेब देवकर उपस्थित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *