घोटी टोलनाक्याजवळ बर्निग ट्रकचा थरार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मुंबई महामार्गावर घोटी टोल नाक्याजवळ ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे.सदर घटना अशी की कुरिअरचे पार्सल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतला. घटनास्थळी असलेल्या टोल कर्मचाऱ्याला ट्रकने पेट घेतल्याची बाब लक्षात येताच ड्रायव्हरला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. टोल कर्मचार्याच्या तत्परतेने सुदैवाने दुर्घटना  टळली.ट्रक थांबल्यानंतर टोल नाक्याच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच महामार्गावरील वाहतूकही सुरळीत सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *