इगतपुरी प्रतिनिधी
तालुक्यातील मुंढेगाव येथील एका प्लास्टिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा कच्चामाल जळून खाक झाला इगतपुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व कच्चामाल प्लास्टिकचा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले