नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला

नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला

शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी

नांदगाव: प्रतिनिधी

– येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात आज शालेय पोषण आहार शिजवताना कुक्कर फुटला व यात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला किरकोळ भाजल्या दैव बलत्वर म्हणून त्या वाचल्या मुळात गेल्या अनेक वर्षांपासून याच महिला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना विमा संरक्षणासाठी लढा देत असुन आज त्यांच्यावरच वेळ आली आहे या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील शाळेचे मुख्याध्यापक जनाब शहीद अख्तर यांनी तात्काळ धाव घेऊन मदत केली व जखमी झालेल्या महिलांना औषधोपचार केले.आजच्या घटनेने शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन याबाबत सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी नांदगाव येथील नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात आज शालेय पोषण आहार शिजवताना कुक्कर फुटला यात संगिता सोनवणे व आशाबाई काकळीज या दोन महिला किरकोळ भाजल्या दैव बलत्वर म्हणून या महिला थोडक्यात बचावल्या मुळात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना न्याय मिळावा त्यांचे वेतनवाढ व्हावी यासह त्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी या महिला लढत असुन आज त्यांच्यावरच वाईट वेळ आली होती मात्र नशीब चांगले असल्याने कोणालाही जास्त इजा झाली नाही मात्र शासनाने आतातरी या महिलांचा विचार करावा व त्यांच्या मागण्या मान्य कराव्या मुळात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना देण्यात येणारे साहित्य देखील जुने झाले आहे ते बदलून मिळावे देण्यात येणारा किराणा उत्कृष्ट दर्जाचा मिळावा यासह इतर अनेक मागण्या आहेत त्याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी या माहिलांकडून करण्यात येत आहे.
आमचा लढा यांसाठीच सुरू
आजच्या या घटनेनंतर तरी सरकारने आमच्या सारख्या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आज देवाची कृपा म्हणून आम्ही वाचलो मात्र अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला कामगार किंवा मदतनीस जखमी होऊन कायमस्वरूपी अपंग झाल्या आहेत शासनाने कृपया आमची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा आमचा लढा यांसाठीच सुरू आहे.
संगीता सोनवणे अध्यक्ष आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *