पंचवटी :प्रतिनिधी
नांदूर नाका येथील राहुल धोत्रे हत्याकंडत भाजपच्या माजी नगरसेवक उद्धव निमसे हे अटकेत असतानाच पंचवटीत झालेल्या गोळीबार प्रकरणात आता भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना देखील पोलिसांनी आज अटक केली. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे नाशकात असतानाच भाजपचे माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पंचवटीत तीन दिवसांपूर्वी गोळीबार घटना घडली होती, यात11 जणांना अटक करण्यात आली आहे. जगदीश पाटील यांनी या प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावली हे लवकरच उजेडात येणार आहे.