उत्तर महाराष्ट्रासह समृद्धी महामार्गावरील सर्वांत मोठा आरोग्य थांबा!

ओसाड माळरानावर ‘एसएमबीटी’च्या रूपाने उभी राहिली 600 तज्ज्ञ डॉक्टरांची चळवळ

नाशिक ः प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य, पण ओसाड माळरानावर वसलेले एसएमबीटी हॉस्पिटल आज राज्यात आरोग्यसेवेचे एक आदर्श मॉडेल ठरत आहे. अवघ्या दशकभरापूर्वी जिथे पायवाटाही नव्हत्या, तिथे आज ’एसएमबीटी’च्या रूपाने एक चळवळ उभी राहिली आहे. हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 40 लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. तीन लाखांहून अधिक रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल करून सेवा दिली आहे. दोन लाख शस्त्रक्रिया, तर 21 हजार 345 क्लिष्ट हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. याठिकाणी सहाशेहून अधिक डॉक्टर, नर्सिंग आणि तांत्रिक कर्मचारी मिळून तीन हजार कर्मचार्‍यांचे सामर्थ्य कार्यरत आहे.
बाराशे बेड्स, 17 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, सुसज्ज अल्ट्रा मॉडर्न कॅथलॅबमध्ये दररोज शेकडो रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. याठिकाणी ऑपरेशनआधी आणि नंतरची काळजी प्रशिक्षित स्टाफकडून घेतली जात असल्याने रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढला आहे. हॉस्पिटलमध्ये रोज एक हजार रुग्ण विविध भागांतून उपचारासाठी दाखल
होतात.
विशेष म्हणजे, इथे केवळ शासकीय योजनांमधील मोफत सेवा नाही, तर अनेक अशा शस्त्रक्रिया ज्या योजनांमध्ये येत नाहीत, त्यादेखील ’आरोग्यसाधना’ शिबिराच्या माध्यमातून मोफत केल्या जात आहेत. या योजनेंंतर्गत मोफत नसलेल्या आजारांवरील उपचार घेण्यासाठी रुग्णांना केवळ पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी तपासण्या आणि सवलतीतील औषधांचा खर्च उचलावा लागतो. ही केवळ रुग्णसेवा नव्हे, तर सामाजिक दायित्व आणि वैद्यकीय मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे.
एसएमबीटीमध्ये सध्या हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, मेंदू आणि मणक्याचे आजार, स्त्रीरोग, बालरोग, मूत्रविकार, पोटविकार, जनरल सर्जरी, किडनी आणि डायालिसिस अशा 26 पेक्षा अधिक सुपर स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा आणि वैद्यकीय ताकद इथे उपलब्ध असल्याने हजारो रुग्णांची पावले आता एसएमबीटीकडे वळू लागली आहेत.

♦ आरोग्यसाधना शिबिराची दहा वर्षे पूर्ण.
♦ 40 लाख गरजू रुग्णांवर उपचार.
♦ 3 लाख रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार.
♦ 2 लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया.
♦ 21 हजार 345 रुग्णांवर हृदयविकार शस्रक्रिया.

दहा वर्षांपासून या चळवळीत कार्यरत
ही केवळ वैद्यकीय सेवा नाही, तर ही एक आरोग्य चळवळ आहे. मी या चळवळीत स्वखुशीने गेल्या दहा वर्षांपूर्वी सहभागी झालो. माझ्यासमोर अनेक डॉक्टरांनी मुंबई-पुण्यासह इतर महत्त्वाची मोठी शहरे सोडून या डोंगराळ भागात काम करण्याचा निर्धार केला. आज उत्तर महारष्ट्रातील सर्वांत अद्ययावत असा हा हृदयविकार विभाग साकारण्यात आला आहे. याठिकाणी क्लिष्ट हृदयविकारासंबंधित तावी, आयव्हस आणि रोटासारख्या कॉम्प्लेक्स अन्जिओप्लास्टी होत आहेत.
– डॉ. गौरव वर्मा, हृदयविकारतज्ज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल

…ही तर संस्कारांची परंपरा
येथे येणारा प्रत्येक रुग्ण आम्हाला केस म्हणून नाही, तर माणूस म्हणून दिसतो. त्याच्या वेदनेमागे असलेली सर्वसामान्यता, असहायता आणि भीती आम्हाला जाणवते. लोक समजतात की, मोठं काही करायचे असेल तर शहरात जावे लागते. पण आम्ही डोंगराळ भागात सेवा देऊन हजारोंचे आयुष्य बदलतो आहोत. हाच आमचा आत्मसन्मान आहे. ही आरोग्यसेवा नव्हे, ही संस्कारांची परंपरा आहे.
-डॉ. मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी
हॉस्पिटल

एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटला टाटा
मेमोरिअल सेंटरचे तांत्रिक मार्गदर्शन

दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी याठिकाणी अत्याधुनिक बीएमटी अर्थात, बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट, कार टी सेल थेरपी युनिट उभारण्यात आले आहे. यामुळे हजारो रक्तविकार कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलसोबतचा तांत्रिक मार्गदर्शन करार झाल्याने उपचारातील दर्जा उंचावला आहे. विशेष म्हणजे, यंदा 100 मायलोमा केसेसवर मोफत उपचार करण्याचा आमचा मानस आहे.
– डॉ. गिरीश बदरखे, रक्तविकार कर्करोगतज्ज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *