घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी जनजागृती रॅली

सिडको : विशेष प्रतिनिधी
महानगरपालिकेकडून घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व उपायुक्त (कर) सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली सिडको विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात काढण्यात आली.
घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीला गती देण्यासाठी नवीन नाशिकचे विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांनी स्वतः पुढाकार घेत बाइक रॅलीचे नेतृत्व केले. नवीन नाशिक विभागीय कार्यालयातून हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. विभागीय अधिकारी स्वतः दुचाकीवर सहभागी होत नागरिकांशी थेट संवाद साधत महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करीत होते. ही रॅली उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, मोरवाडी, खोडेनगर, सदाशिवनगर, कर्मयोगीनगर, गोविंदनगर व अश्विननगर परिसरातून काढण्यात आली. घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार नागरिकांनी थकबाकी तात्काळ भरावी, यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ‘कर भरा, सहकार्य करा’ अशा घोषणांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जनजागृती करण्यात आली. बाइक रॅलीमध्ये कर निरीक्षक अंबादास विधाते, राजेंद्र मोरे, आनंद जाधव, संतोष गायकवाड, राजू कवर, मारुती डोंगरे तसेच लिपिक व कर्मचारी सहभागी झाले होते.

Public awareness rally for recovery of house rent and water bill arrears

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *