50 लाखांचा निधी मंजूर; उर्दू शाळा इमारत कागदावरच

बांधकामाची प्रतीक्षा, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

ओझर : वार्ताहर
ओझर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची मोडकळीस आलेली जुनी इमारत पाडून तब्बल चार ते पाच महिने उलटून गेले असले तरीही नव्या इमारतीच्या बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
आमदार दिलीप बनकर यांनी उर्दू शाळेच्या नवीन इमारतीसाठी 50 लाखांचा निधी मंजूर करून दिला असतानाही प्रत्यक्ष काम रखडले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जुनी इमारत पाडल्यानंतर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत केली आहे. शासनाकडून निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष बांधकामास विलंब होत असल्याने शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना पालकांमध्ये असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नव्या इमारतीच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा दिला आहे.

पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे काम अद्याप सुरू न होणे ही दुर्दैवी बाब आहे. जुनी इमारत पाडल्यानंतर महिन्यांनंतरही प्रत्यक्ष बांधकामाला मुहूर्त सापडत नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे. काम केवळ कागदावरच आहे, प्रत्यक्षात काहीच घडत नाही.
– जाकिर कुरेशी, नागरिक, ओझर

‘ऊर्दू शाळेच्या इमारतीअभावी मुलांना दुसर्‍या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षण घ्यावे लागत आहे. अभ्यासावर परिणाम होत आहे. निधी मंजूर असूनही काम सुरू न होणे हे अन्यायकारक आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नव्या शाळा इमारतीचे काम सुरू करावे. – तोसिफ पठाण, पालक, ओझर

Fund of Rs 50 lakhs approved; Urdu school building only on paper

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *