भावनांचा चाललेला कोलाहल मी शब्दात मांडतो. साचू नये मेंदूत कचरा म्हणून शब्दांनी निचरा करतो. मात्र, काय करावे कळत नाही? कारण आतून शब्दांचे झरे फुटायला लागतात. अनवरत वाहतात भावना… थांबवता थांबत नाही. शब्दांच्या आश्रयाने होतात मुक्त… मात्र, आता वाटते जावे थोडे मौनात… गाठावा एकांत जिथे मनाची नसावी चलबिचल…निर्विचार, निर्विकार होऊन बघावे केवळ साक्षी बनून स्वतःला… प्रत्येक ये, जा करणारा श्वास
अनुभवत…
व्हॅलेंटाइन डे साजरा करावा की नाही, याविषयी बरेच मतभेद आहेत. प्रेम हे अंतरात्म्यातून फुलणारी एक तरल भावना आहे. अशा प्रेमाला व्यक्त होण्यासाठी प्रदर्शनाची किंवा स्पेशल डेची गरजच काय? शिवाय भारतीय संस्कृतीत इतके सणवार असताना अशा पाश्चात्य डेची आवश्यकताच नाही, असे विविध विचारप्रवाह आहेत नाही का? परंतु प्रेमाला फुलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो असायला हवा ना…
आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवन इतके गतिमान झाले आहे की, लाजून हसणे अन् हसून पाहणे अशा गोष्टींसाठी वेळच नाही. त्यामुळे एकमेकांना ओळखायला, प्रेम व्यक्त करायला असे व्हॅलेंटाइन डेचे निमित्त शोधले जाते. यानिमित्ताने का होईना पण यंत्रमय व रुक्ष होत चाललेल्या जीवनरूपी वृक्षावर प्रेमाची पालवी फुटते. पाश्चात्यांचे अधानुकरण करणे किंवा त्यांना तीव्र विरोध करत संस्कृतीची चौकट बंदिस्त करणे या दोन्ही गोष्टी म्हणजे एकदम टोक गाठणे झाले असे होणार नाही का? अशावेळी अशा नवीन डेज्ना आपण आपल्या संस्कृतीत सामावून घेऊन आपल्या संस्काराचा रंग या पिढीच्या संकल्पनांना दिला तर…संस्कृतीच्या चौकटीची कक्षा रुंद केली तर…
खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची वाट पहावी लागत नाही. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी चेहर्यावरची लालीदेखील पुरेशी असते. तिच्या किंवा त्याच्या चेहर्यावरचे हसू, नजरेचा एक कटाक्ष प्रेमाची कबुली देण्यासाठी पुरेसा असतो. पण काळाने रुपडे पालटले त्याप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याच्या कन्सेप्ट बदलल्या, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हॅशटॅगच्या जगात भावना व्यक्त करायला विविध डे संस्कृती आली आहे. धावपळीच्या दुनियेत व्यक्त होण्यासाठी हे डे मदत करतात. नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिना आला की, तरुण-तरुणींना वेध लागतात ते अशाच एका प्रेमाच्या दिवसाचे म्हणजेच व्हॅलेंटाइन डेचे…
प्रेम म्हणजे एक अनोखी भावना जी आपल्या जीवनाला रंगीत बनवते. प्रेमाच्या रंगात रंगून जाणे ही एक अद्भुत अनुभूती असते. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या खुशीत खूश असणे, एकमेकांच्या दुःखात सहभागी होणे. तसं पाहता प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील रोमँटिक प्रेम म्हणजे दोन व्यक्तींमधील आकर्षण आणि प्रेम, पारिवारिक प्रेम म्हणजे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम, मित्रत्वाचे प्रेम म्हणजे मित्रांमधील प्रेम आणि बंध नि आत्मीय प्रेम म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी असलेले प्रेम. याच प्रेमाचे काही महत्त्व आहेत. प्रेम आपल्या जीवनाला अर्थ देते, आपल्याला मजबूत बनवते आणि एकमेकांशी जोडते. प्रेमात पडणे म्हणजे एक अनोखी अनुभूती असते. जेव्हा आपण प्रेमात पडतो, तेव्हा आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू होतो. याच प्रेमात पडल्याचे काही चिन्हे दिसून येतात. प्रेमात पडल्यावर हृदयाची धडधड वाढते, आपल्या चेहर्यावर स्मित असते, एकमेकांना पाहण्याची इच्छा असते तसेच एकमेकांशी बोलण्याची इच्छा असते. याचप्रमाणे प्रेमात पडल्याचा अनुभव स्पष्ट जाणवतो. प्रेमात पडल्यावर आपल्याला एकमेकांप्रति आदर वाटतो, एकमेकांवर विश्वास वाटतो, एकमेकांच्या जीवनात सहभागी होण्याची इच्छा असते.
तसेच या प्रेमात काही परीक्षांना सामोरे जावं लागते. प्रेमाची परीक्षा म्हणजे प्रेमात यश आणि अपयशाची कारणे. त्यातील यशाची कारणे म्हणजेच प्रेमात यशासाठी संचार, विश्वास, समजूतदारपणा आणि सहिष्णुता महत्त्वाचा असतो. याच गोष्टींचा अभाव हा अपयशास कारणीभूत ठरतो. प्रेम आणि विवाहातील संबंध आणि महत्त्व पाहता प्रेम अनोखे असते. विवाह म्हणजे दोन व्यक्तींमधील एक पवित्र बंध. प्रेमाची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते जेणेकरून प्रेम जपले जाईल. प्रेम जपले की ते वाढीस लागेल. ज्यामुळे प्रेम यशस्वी ठरण्यास मदत होईल.
माझ्या मनात जे असते
तेच तिच्या मनात असते
ते जगाला दिसत नसते
जग उगाच भ्रमात असते..
Walking in the world of love, wrapped in the blanket of memories…