अतिक्रमण न हटवल्यास ‘मनसे स्टाइल’ कारवाई

जिल्हाध्यक्ष स्वाती मगर यांचा आक्रमक पवित्रा

मनमाड : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढत्या अतिक्रमणामुळे स्थानिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, मनसे जिल्हाध्यक्ष स्वाती मगर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. हे अतिक्रमण न हटल्यास मनसे स्टाइलने कारवाई करेल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात येते. खाद्यपदार्थ आणि इतर दुकाने लागतात. सायंकाळी स्थानिकांना चालायलादेखील जागा राहत नाही. यामुळे येत्या आठ दिवसांत हे अतिक्रमण काढावे, अन्यथा मनसे स्टाइल अतिक्रमण काढण्यात येईल, असा इशारा स्वाती मगर यांनी दिला. अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे आता मनसेने पुढाकार घेतला असून, त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. जर या कालावधीत अनधिकृत गाड्या आणि स्टॉल हटवले नाहीत तर होणार्‍या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय, जर हे काढले नाही तर मनसे स्टाइलने आंदोलन करू, असेही मगर यांनी पत्रात म्हटले आहे.

‘MNS style’ action if encroachments are not removed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *