पुरोहित संघाकडून प्रायश्चित्त विधी
नाशिक : प्रतिनिधी
रंगपंचमीच्या दिवशी रामकुंड परिसरात काही हुल्लडबाजांकडून गोदावरी नदीत चप्पल-बूट फेकून पवित्र तीर्थक्षेत्राचा अवमान केल्याच्या घटनेनंतर श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे मंगळवारी प्रायश्चित्त म्हणून ‘उदक शांती’ विधीचे आयोजन करण्यात आले. या विधीद्वारे गोदावरी मातेचे पावित्र्य अबाधित राहावे व झालेल्या प्रकाराबद्दल धार्मिक प्रायश्चित्त व्हावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
रंगपंचमीच्या दिवशी काही हुल्लडबाज युवकांनी गोदावरी मातेच्या पाण्यात चप्पल-बूट फेकून अशोभनीय कृत्य केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाने उदक शांतीचा धार्मिक विधी आयोजित करून त्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.
या उदक शांती विधीचे यजमान म्हणून पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी होते. आचार्य म्हणून वे. मू. वैभव दीक्षित यांनी विधी केला. यावेळी वे. मू. शेखर शुक्ल, वे. मू. मंदार देव, वे. मू. गौरव पंचभैये, वे. मू. पंकज उंदीरवाडकर, अरविंद साने, योगेश मांडवगणे, प्रसाद मांडवगणे, सोमनाथ बेळे, सतीश शुक्ल, सौरभ गायधनी, अमित पंचभैये, अतुल पंचभैये, सदानंद देव, वे. मू. नितीन पाराशरे, वे. मू. स्वप्नील पंचभैये, निखिल देव, चिन्मय देव, निखिल बेळे, दिलीप शुक्ल, प्रतीक शुक्ल, नीलेश दीक्षित, सुमित बेळे आदी तीर्थपुरोहित बांधव व नागरिक उपस्थित होते.
Godavari’s ‘watery peace’ after slipper throwing incident