‘मेला तो शेवटचा होता’ नाटकाचा रंगतदार प्रयोग

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित सोळाव्या औद्योगिक व व्यावसायिक नाट्य महोत्सव स्पर्धेत बजाज ऑटो लिमिटेडच्या कला व क्रीडा विभाग, साणंद यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘मेला तो शेवटचा होता!’ या दोन अंकी नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विजय खानविलकर लिखित आणि संजय मारणे दिग्दर्शित या नाटकाने ग्रामीण पाश्वर्र्भूमीवर आधारित कथानकातून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. प्रभावी संवाद, सशक्त अभिनय आणि नेटक्या सादरीकरणामुळे नाटकाची रंगत अधिक खुलली.
नाटकाच्या सादरीकरणात पाश्वर्र्संगीताची जबाबदारी विनोद पाटील व दिलीप मांडगे यांनी सांभाळली. प्रकाशयोजना पुरुषोत्तम जोशी व राजेंद्र वायकोस यांनी केली. नेपथ्याची मांडणी संपतराव उगले व दीपक हिवाळकर यांनी केली. वेशभूषा महेश ताठे व प्रशांत हेलोडे यांनी, तर रंगभूषा गणेश जिवरख व सारिका इंगळे यांनी साकारली. रंगमंच व्यवस्थापन आकाश पैठणपगारे यांनी पाहिले. निर्मिती व्यवस्थापक अनिल संघवी, निर्मितीप्रमुख सचिन थाले आणि मार्गदर्शक म्हणून नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कलाकारांनीही आपल्या भूमिका समर्थपणे साकारल्या. मोहिनी सावजी, सारिका इंगळे, प्रशांत हेलोडे, गणेश जिवरख, धनंजय दाणे, बबन राऊत, विनोद पाटील, राजेंद्र वायकोस, आकाश पैठणपगारे यांनी उल्लेखनीय अभिनय केला. पूर्वा गवई व गौरी बराटे यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांची भूमिका, तर दीपक हिवाळकर, पुरुषोत्तम जोशी, संपतराव उगले, महेश ताठे व नंदकुमार मोरे यांनी ग्रामीण भागातील पुरुषांच्या भूमिका साकारून नाटकाला पूरक
साथ दिली.
या नाट्यप्रयोगाने औद्योगिक नाट्यमहोत्सवात वेगळी छाप पाडत प्रेक्षकांकडून भरभरून
दाद मिळवली.

A colorful experiment in the play ‘He was the last to die’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *