भूसंपादन विभागातील कर्मचार्‍यांना मुदतवाढ

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या नगरनियोजन व भूसंपादन विभागातील कामाचा वाढता ताण लक्षात घेता, तात्पुरत्या कर्मचार्‍यांच्या नियुक्तीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
शहरात दीड वर्षाने होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात. पंचवटीतील रामकुंड परिसर व साधुग्राममध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने सदर भागात पायाभूत सुविधा सक्षम ठेवण्याची जबाबदारी महापालिकेवर असते. सध्या मनपाच्या आस्थापनेवर मंजूर पदांच्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने मनुष्यबळात तूट निर्माण झाली आहे. परिणामी, नियमित कामांबरोबरच सिंहस्थासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करताना प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे. विकास आराखड्यातील आरक्षित जागांचे संपादन, रस्ते विकास, खासगी वाटाघाटी, न्यायालयीन प्रकरणे, तसेच टीडीआरद्वारे जमीन ताब्यात घेण्याची कामे या विभागामार्फत केली जातात. या पार्श्वभूमीवर शासकीय कामाचा अनुभव असलेले आणि संगणकीय ज्ञान असलेले कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

Extension of tenure for employees of Land Acquisition Department

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *