हिंदू धर्मात अनेक सण- समारंभ आहेत. चैत्र महिन्यापासून आपले सण सुरू होतात. चैत्र पाडवा म्हणजेच गुढीपाडवा, त्यानंतर येतो तो दिवस अक्षयतृतीया! म्हणजेच आखाजी. हापण एक अतिशय मंगलमय दिवस. या दिवसापासून सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे म्हणतात. खानदेशात तर या सणाचे खूप महत्त्व आहे.
अक्षय याचा अर्थ क्षय न होणारे, कधीही न संपणारे, असे! या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य, शुभकार्याचे फळ अनंत टिकते. या दिवशी होमहवन, विष्णुपुराण करतात! याच दिवशी भगवान परशुराम जयंती असते, तसेच पवित्र गंगेचा अवतारही याच दिवशी झाला आहे. पांडवांना अक्षय पात्रही याच दिवशी मिळाले होते! त्रेतायुगाचा प्रारंभ
अन्नपूर्णेचादेखील जन्म याच दिवशी झालेला आहे. कृष्णा व सुदामा भेटीचा संदर्भही या दिवसाशी जोडला जातो. खानदेशात या दिवशी सासुरवाशिणी महिला घरी म्हणजे माहेरी येतात. उखाणे घेतात, खूप जण या दिवशी सातूचं पीठ किंवा अन्य काही गोष्टी दान करतात. आखाजीची गाणी खानदेशात प्रसिद्ध आहेत. अहिराणी भाषा मुळातच गोड, त्या गाण्यात फार गोडवा असतो. आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय व ऊना आखाजीना सण, आखाजीना सण आला, आखाजीना गौराई ना झोका ही गावरान गाणी प्रसिद्ध आहेत.
माहेरचं वर्णन या गाण्यात केलं जातं. त्यादिवशी चांगल्या कार्याची सुरुवात करतात. खानदेशमधील आखाजी सण आणि खापर्यावरचे मांडे, आंब्याचा रस. आहाहा! पूर्वी एकत्र कुटुंबातील मुलींचा कोंडमारा होत असेल त्यामुळे मुली माहेरी आल्या की, झोक्यावर खेळ खेळताना गाणे म्हणत. मी जळगावचीच असल्याने या सणाला जास्त कनेक्ट होते. आपणही आपली सकारात्मक ऊर्जा, निरोगी शरीर, बंधुभाव, दान, प्रेम अक्षय राहील याची काळजी घेतली पाहिजे.
आपली ऊर्जा अक्षय
आपलं प्रेम अक्षय
विश्वास अक्षय,
आनंद, भक्ती अक्षय,
सकारात्मक विचार अक्षय,
सत्पात्री दानही अक्षय!
पृथ्वी, आग, तेज, वायू, जल या पंचतत्त्वांंचे ऋण मानायची तिथी! याच दिवशी अन्नपूर्णा जयंती, तोही दिवस महत्त्वाचा. आपल्या पितरांना स्मरण करण्याचा हा दिवस. जगण्यात जे जे द्याल ते अक्षय असेल. पुराणात त्याचा उल्लेेख नक्कीच आहे देवांचे व पूर्वजांचे ऋण या दिवशी फेडायचे असतात. भरभरासाठी आपण ही पूजा करतो… चला तर मग आनंदाने साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय असलेल्या या अक्षयतृतीयेचे स्वागत करूया! आनंदाची ऊर्जा मिळवू या!
Akhaji