राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा

पुण्यात गारांचा पाऊस, उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा

पुणे :
हवामान विभागाच्या या अंदाजानंतर मुंबईतील मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाणे, पुणेसह विविध जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याचं चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसत असून, अनेक जिल्ह्यांत वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडला आहे.
पुण्यात बुधवारी (ता. 22) कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23.7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दुपारनंतर वातावरण काहीसे ढगाळ झाले आणि सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र या पावसामुळे उकाड्यापासून फारसा दिलासा मिळाला नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, पिंपरी, नाशिक फाटा, आकुर्डी, तळेगाव, चिंचवडसह शहरातील काही भागांत हलका पाऊस पडला. तर वारजे, नांदेड सिटी आणि सिंहगड रोड परिसरात गारांचा वर्षाव झाल्याने नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला. भारतीय हवामान खात्याने 20 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या, विशेष म्हणजे काही ठिकाणी गारांचा पाऊसदेखील पडला आहे. उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे, उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना गारांच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला आहे.

Thunderstorm warning in the state again

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *