चारा-पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळांचा गोदाकाठला डेरा

पशुपालकांसह पाळीव जनावरांनी परिसर गजबजून गेला

निफाड : तालुका प्रतिनिधी
यावर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीपातळी झपाट्याने घटली. परिणामी, पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. तर जानेवारीपासूनच चाराटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे पशुधन सांभाळण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातील पशुपालक
शेळ्या-मेंढ्या घेऊन सहकुटुंब निफाडच्या गोदाकाठ भागात डेरेदाखल झाले असून, या पशुपालकांसह पाळीव जनावरांनी हा परिसर गजबजून गेला आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नदी-नाले शुष्क झाले. साहजिकच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. तर यावर्षी जानेवारीपासूनच चाराटंचाईचा सामना करावा लागल्याने शेजारील मालेगाव, येवला, नांदगाव, तालुक्यांसह धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात पशुपालक आपली जनावरे घेऊन निफाडच्या गोदाकाठ परिसरात दाखल झाले आहेत. परिणामी गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी, निफाड, म्हाळसाकोरे, शिंगवे, खानगावथडी, कोळगाव, कानळद आदी गावांच्या शिवारात हे पशुपालक जनावरे चारताना तसेच आपले बिर्‍हाडसह मुक्कामी थांबलेले दिसतात.

Shepherds camp on the banks of the river in search of fodder and water.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *