साप्ताहिक राशिभविष्य

दि. 3 ते 9 मे 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : लाभ संभवतो
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ प्रतिकुल आहेत. शनिची साडेसाती सुरू आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा, कोर्ट कचेरीच्या शासकीय कामास विलंब होईल. शेअरमध्ये लाभ संभवतो. नोकरदारांना अडचणी संभवतात. व्यापारी, व्यावसायिकांना अनुकूलता लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अडचणीतून वाटचाल करावी लागेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील. कामात दक्ष रहा. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : नफा वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शुक्र प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी त्रस्त करतील. खर्च वाढतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. नोकरदारांनी वाद टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांचे नफ्याचे प्रमाण वाढेल. शासकीय, कोर्ट कचेरीची कामे लांबणीवर पडतील. प्रकृती जपा.
कर्क : काळजी घ्या
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता फारशी नाही. नोकरदार व व्यापारी व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घेणे उचित ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : विवाह जमतील
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. मंगळ, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. अविवाहितांचे विवाह जमतील. अनुरूप वधूवर मिळतील. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. आरोग्याची कालजी घ्या.
कन्या : आर्थिक दिलासा
या सप्ताहात मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहेत. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक दिलासा मिळेल. धनचिंतांना उतार पडेल. खर्च वाढतील. नोकरदारांच्या कामात अडचणी येतील. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळणार नाहीत. कौटुंबिक वादविवाद टाळावेत. मनावर संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : कामे मार्गी लागतील
या सप्ताहात बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. शेअरमध्ये गुंतवणूक टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांनी व्यवहारावर लक्ष केंद्रित करावे. आरोग्यप्रश्नांची नीट काळजी घ्या.
धनु : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. शेअरमध्ये सावध भूमिका ठेवा.
मकर : प्रगती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी दूर होऊन प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबू नये. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. शेअरमध्ये लाभ होतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. पथ्य पाळा.
कुंभ : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्चाच्या तुलनेत पैशांची आवक कमी राहील. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. आरोग्य चांगले राहील.
मीन : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांच्या कामात प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक व्यवहारात यश मिळेल. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट कचेरीची कामे लांबणीवर टाळणे योग्य ठरेल. आरोग्य चांगले राहील.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *