तो समोर आला आणि पोटात बटरफ्लाइज येणे, दिल की धडकन वाढणे ,वैगेरे होऊ लागले. कुणास ठाऊक पण सारखे त्याच्याशी बोलावे, भेटावे मग भेटून झाल्यावर लगेच कॉल करावा आणि कॉल होत नाही तेवढ्यात टेक्स्ट करावा म्हणजे थोडक्यात काय तर आमच्या बोलण्यात कुठे खंड पडू नये असं सारखे वाटते आहे. जणू काही सगळे जग गुलाबी झाले आहे आणि त्यात आमच्या प्रेमाच्या रंगाने आणखीन बहर पडली!
पण उगाच ओव्हथींकिंग मुळे की काय, वाटले की अरे, हे सगळे आपले कॉलेज संपते आहे म्हणून होते आहे, तो दूर जाईल, भेटणार नाही, या विचाराने भावनिक व्हायला होते आहे म्हणून असं वाटत आहे की खरंच हे प्रेम आहे. पण या सगळ्यांचा विचार करण्याऐवजी म्हंटले का नाही जो क्षण आहे तो जागून घेऊया. वाटते आहे प्रेमासारखे तर ठीक आहे ना, इतर भावनांसारखी ही पण एक भावना, तर का नाही अनुभवूया ही प्रेमाची जादुई दुनिया.
हे ही वाचा: तृतीयपंथीयांना मिळणार आता ओळख!
पण मुळात, माझे हे पहिले प्रेम नव्हे! आणि ते इन्स्टाग्राम वर वैगेरे वाचून असे वाटले की प्रेम काय तर एकदाच होते. पण अजिबात नाही बरं! म्हणजे किमान आताच्या माझ्या परिस्थितीवरून मी तरी सांगू शकते की प्रेम बर्याचदा होते फक्त आपण तयार असावे.
अरेच्चा, तुम्हाला सांगितलेच नाही ना! प्रेमप्रकरण जरा वन साईड च म्हणावे लागेल. त्याला काही याचा थांगपत्ता नाही आहे. मी आपली इथे स्वप्नांचे महल बांधत आहे. पण असो, इतक्या लवकर मी काही त्याला सांगण्याची घाई करणार नाही. पहिले मला तरी फिगर आऊट होऊ देत की बाबा, हे खरंच प्रेम आहे की प्रेमाचा आभास!
अजून एक गोष्ट, असं म्हणतात की एकतर्फी प्रेमात खूप त्रास होतो आणि घुसमट होते. पण हे निष्कर्ष काढण्याअगोदर प्रत्येकाने आपापले अनुभव घ्यावे. मला तर भन्नाट वाटते आहे. त्याच्याशी मी मनसोक्त बोलू शकते, काहीही सांगू शकते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्यात कुठलाच ताण-तणाव, बांधील राहणे नाही. ना त्याच्याकडून काही अपेक्षा की कॉल यावा की टेक्स्ट यावा, ना कुठला ऑकवॉर्डनेस,सगळे कसं जसे होते आहे तसे स्वीकारणे. फक्त त्याचा सहवास अनुभवता येतो, याचा मला काय तो परमोच्च आनंद आणि हे प्रेम मला हवे हवेसे वाटते.
प्रेमाची एक खासियत म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन अनुभवायला मिळते, आणि सगळे नव्याने घडते हा आभास किती सुखद असतो. एक गोष्ट सांगते तुम्हाला, जेव्हा कॉलेज मध्ये एका मैत्रणीला याबद्दल सांगितले तेव्हा तो समोर दिसतो तेव्हा दर वेळी तिचे ते चिडवणे, खूप भारी वाटते. आता तुम्ही म्हणाल, ग्रॅज्युएशन व्हायला आणि काय हिचा बालीशपणा, पण आता आहे तर आहे, मी काय करू?
पण आता स्वतःला एकच गोष्ट मी सांगेन, प्रेम करताना कुठलाही गिल्ट नको, मनसोक्तपणे त्या माणसावर प्रेम कर आणि जियो तो हर पल ऐसे जियो जैसे की आखिरी हो! आणि हो, त्याला एकदा तरी,
बावरे से इस जहॉं में बावरा एक साथ हो,
इस सयानी भीड में बस हाथो में तेरा हाथ हो!.
असे म्हणायचे आहे. जरा क्लीशे आहे, पण आहे तर आहे, मी काय करू?
ऋतुजा अहिरे