– मुकुंद बाविस्कर
अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा अत्यंत पवित्र मानला जातो. दर तीन वर्षांनी येणार्या या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. सध्या अधिक मास सुरू असल्याने शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. नवी तांबट आळी येथे समस्त कंसारा मंडळी यांच्या वतीने अधिक मासानिमित्त आयोजित भव्य विष्णुयाग सोहळा भक्तिभाव, श्रद्धा आणि धार्मिक उत्साहात झाला.
नवहितगुज महिला मंडळातर्फे श्रीकृष्णाचे पूजन :
लाडशाखीय वाणी समाजाच्या नवहितगुज महिला मंडळातर्फे अधिक मासानिमित्त सामूहिक श्रीकृष्ण पूजा व श्रीविष्णुसहस्त्रनामासह तुलसीदल अर्चन हा आध्यात्मिक उपक्रम खुटवडनगर येथील माहेरघर मंगल कार्यालयात झाला. यात 251 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भागवताचार्य श्री कोदंडपाणी शास्त्री गुरुजी यांनी अधिकमास, पुरुषोत्तम मास व त्याचे धार्मिक महत्त्व यावर मार्गदर्शन केले. श्रीगणेश पूजन, श्रीकृष्ण पूजन व पुण्याहवाचन करण्यात आले. उपस्थित महिलांच्या हस्ते श्रीविष्णुसहस्त्रनाम पठणासह सहस्र तुलसीदल अर्चन करण्यात आले. यावेळी दोन लाख 75 हजार तुळशीपत्रांचे अर्चन करण्यात आले.
अधिक मासानिमित्त अभिषेक सोहळा
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पंचवटी केंद्राच्या वतीने आयोजित 51 सहस तुलसीदलार्चन आणि अभिषेक सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रो. निलाभ तिवारी उपस्थित होते. अधिक मासानिमित्त एकादशी पर्वकाळावर आणि व्यतिपात योगाच्या मुहूर्तावर हा भव्य धार्मिक सोहळा पार पडला, ज्यात 51 जोडप्यांनी सपत्नीक बसून पूजा व अभिषेक केला. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैदिक मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पिढ्यांपर्यंत वेद मुखोद्गत करून ही श्रुती परंपरा जिवंत ठेवली आणि त्यासाठी मोठे बलिदान दिले, याची आठवण प्रो. तिवारी यांनी करून दिली. प्रमुख पाहुणे म्हणून लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश प्रभुणे महाराज, वेदाचार्य रवींद्र पैठणे, मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी उपस्थित होते.
अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा :
अखिल भारतीय नाट्यपरिषद, नाशिक शाखेतर्फे आयोजित अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सोहम साधना संस्थेच्या वार्ता लिफ्टर या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. व्हाइट एलिफेट प्रॉडक्शनच्या ट्युलिप या एकांकिकेला द्वितीय, तर घननेस प्रॉडक्शनच्या फैमिली विमा या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. त्याचबरोबर दिनार केळुस्कर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर गौरसी मोरे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिर येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
स्पर्धेचे परीक्षण आशुतोष वाघमारे, अभिजित झुंझारराव आणि पल्लवी पटवर्धन यांनी केले.
संत तुकारामांच्या जीवनावर आधारित आनंदडोह :
आनंदडोह हा संत तुकारामांच्या जीवनावर आधारित एकपात्री मराठी नाटकाचा प्रयोग नाशिक रोडच्या ऋतुरंग फाउंडेशनतर्फे झाला. त्यामधील वरील संवादांनी प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आम्ही तुकाराम महाराज प्रत्यक्ष पाहिले, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केली. चित्रपट, नाटक व मालिकांमध्ये अभिनयाने ठसा उमटवलेले व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी हा प्रयोग सादर केला. तुकारामांच्या अभंगांना अभिनयातून जिवंत करणारा हा प्रयोग लोकप्रिय ठरत आहे.
राष्ट्रचेतना जागृत करणारी काव्यसंध्या :
राष्ट्र प्रथम ही भावना सतत जागृत ठेवण्यासाठी राष्ट्रचेतना जागृत करणार्या काव्याची निर्मिती करण्याची गरज कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त, अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने काव्यसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुर्तकोटी शंकराचार्य संकुलातील नानाराव ढोबळे सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी होते. अध्यक्षीय भाषणात शशिकांत घासकडवी यांनी मराठी साहित्यातील राष्ट्रभक्तीच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला.
प्रा. आनंद अत्रे यांची सुरेल मैफल रंगली :
सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेच्या वतीने स्वर सावाना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे 22 वे पुष्प अनवट आनंदस्वर या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक प्रा. आनंद अत्रे यांची सुरेल मैफल रंगली. यात संगीतप्रेमींना गीतांचा रसिकांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाची सुरुवात देवाचिये द्वारी उभा क्षण भरी या गाण्याने झाली. अशा अनेक गाण्यांना संगीतप्रेमींनी भरभरून दाद दिली. स्वर सावाना प्रमुख प्रशांत जुन्नरे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव सुरेश गायधनी होते. त्यांच्या हस्ते प्रमुख अतिथी अतुल पुराणिक व दुहिता पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला.
‘शिवशंभू गाथा’ला रसिकांची दाद
स्वराज्यासाठी झुंज देणारा तेजस्वी इतिहास गीत, कथा आणि सुरांतून शिवचरित्र उलगडले. नाशिककर रसिकांनी ही शिवशंभू गाथा अनुभवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छोट्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी दाद दिली. शिवप्रेमाचा अभिमान मनात जागवत शिवरायांच्या जयघोषाने सभागृह दुमदुमून गेले. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झाला. रोहित पाटील लिखित या गाथेचे संगीत संयोजनदेखील त्यांचेच होते. गायक सागर म्हात्रे, गौरव महाराष्ट्राचा महाविजेता वैभव थोरवे आणि एकच राजा इथे जन्मला फेम रोहित पाटील या तिन्ही गायकांना प्रथमच एकत्र ऐकण्याची संधी मिळाली. गायिका सानिया जांभेकर व पूजा म्हात्रे यांनी सुरेल सहगायन केले.
अत्रे यांची अनवट आनंदस्वर मैफल रंगली :
शास्त्रीय रागांवर आधारित अप्रचलित गीतांची अनवट आनंदस्वर मैफल रंगली. आजवर फारशी ऐकण्यात न आलेल्या या गीतांनी व त्यामागील कहाण्यांनी रसिकांना तल्लीन केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वर सावाना या सांगीतिक कार्यक्रमाचे 22 वे पुष्प गायक प्रा. आनंद अत्रे यांच्या अनवट आनंदस्वर या कार्यक्रमाने गुंफण्यात आले.
More religious activities on the occasion of the month of Ramadan