जबरी चोरीतील 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातपूर पोलिसांची यशस्वी कारवाई

सातपूर / सिडको : प्रतिनिधी
सातपूर पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत आरोपींना अटक करून घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली असून, त्यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा मोबाइलसह एकूण 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हवालदार तुषार देसले यांनी रेकॉर्डवरील आरोपी राहुल मारुती इंगळे (वय 32, रा. अशोकनगर, सातपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली. या गुन्ह्यांतील एकूण 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा चोरीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तुषार देसले करीत आहेत.
दरम्यान, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी रोहन छबूलाल वाघ (वय 20, रा. श्रमिकनगर, सातपूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दीपक खरपडे करीत आहेत.
ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुषार देसले, दीपक खरपडे, सचिन सुपले तसेच पोलीस अंमलदार सचिन आजबे, सोनू खाडे, अमोल मोरे आणि योगेश्वर गायकवाड यांनी केली.

Stolen property worth ₹1.5 lakh recovered in a robbery case.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *