गॅस सिलिंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना म्हणजेच ऑइल मार्केटिंग कंपन्यांना ग्रामीण भागातील एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या कालवाधीमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना सिलिंडर बुकिंग 25 दिवसांनंतर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी दिली आहे.
सुरेश गोपी हे केंद्रीय मंत्रिमंडळात पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. केंद्र सरकारने अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या काळात मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल राहावा यासाठी ग्रामीण भागात गॅस सिलिंडर बुकिंगसाठी 45 दिवसांचा कालावधी निश्चित केला होता. ग्रामीण भागातील ग्राहक 45 दिवसांनंतर सिलिंडर बुकिंग करू शकत होते. शहरी भागातील एलपीजी ग्राहक 25 दिवसांनंतर बुकिंग करू शकत होते.
पेट्रोलियम मंत्रालयाने सोमवारी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिले आहे. एलपीजी पुरवठ्यामध्ये वाढ झाल्याने आणि सिलिंडर रिफीलसंदर्भातील स्थिती सुधारल्याचं सांगण्यात
आले आहे.
Relief for LPG consumers in rural areas