♦ वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-0 ने खिशात
♦ शुभमन गिलने द्विशतक झळकावत इतिहास रचला
मुंबई :
भारतीय क्रिकेट संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात जागतिक क्रिकेटच्या इतिहासाला गवसणी
घातली.
वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना गिलने अवघ्या 117 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. 133 चेंडूंत 223 धावांची वादळी खेळी करताना त्याने 26 चौकार आणि आठ गगनचुंबी षटकार लगावले. त्यासोबतच भारतीय संघाने इतिहासातील धावांचा पाठलाग करताना सर्वांत मोठ्या विजयाची नोंद केली आहे. रोहित शर्माने देखील आक्रमक खेळी करत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 12000 रन्स पूर्ण केल्या आहेत. भारताने या सामन्यात आठ विकेटने विजय मिळवत मालिका 2-0 ने खिशात घातली.
या ऐतिहासिक खेळीसह शुभमन गिलने इशान किशनचा 126 चेंडूंत द्विशतकाचा विक्रम मोडीत काढत जगातील सर्वात वेगवान द्विशतकवीर बनण्याचा मान मिळवला आहे. गिलचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे द्विशतक असून, हा पराक्रम करणारा तो रोहित शर्मानंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या या खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना सहज जिंकला. याआधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांनाही शुभमन मागे टाकले असून जगातील पहिला फलंदाज ठरलाय.
वेस्ट इंडिज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 405-7 धावा केल्या होत्या. यामध्ये सलामीवीर जॉन कॅम्पबेलने अवघ्या 65 चेंडूत 101 धावांची स्फोटक खेळी केली. त्यानंतर कर्णधार शाय होप याने 94 चेंडूंत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 104 धावांची संयमी आणि तितकीच आक्रमक खेळी केली. अखेरीस अमीर जांगू याने वादळी फलंदाजी करत अवघ्या 70 चेंडूंमध्ये नाबाद 114 धावा कुटल्या आणि वेस्ट इंडिजला पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा करून दिला होता. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची परीक्षा होती. मात्र शुभमन गिलची विक्रमी द्विशतकी आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ओव्हरमध्ये सामना जिंकवला.
Team India easily won the battle to cross the 400-run mark!