काँक्रीटीकरणासाठी रस्ता अचानक बंद

वाहनधारकांना वळसा, अंबड ते फडोळ मळा मार्गावरील प्रकार

सिडको : प्रतिनिधी
अंबडगाव ते फडोळ मळा परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता बंद करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च वाहनधारकांच्या माथी पडत आहे.
अंबड एमआयडीसी परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. एमआयडीसीतील कामगार, दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनधारक मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात. मात्र, काँक्रीटीकरणाच्या कामासाठी अचानक संपूर्ण रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामावर जाणार्‍या कामगारांना पर्यायी मार्गाने फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात
अडचणी येत आहेत.

Road suddenly closed for concreting work.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *