जिल्ह्यातील 789 गावांतील 58.92 पंचनामे पूर्ण

एक लाख 24 हजार 561 खातेदारांचा समावेश

नाशिक : प्रतिनिधी
खरीप हंगाम-2026 मध्ये ट्रिगर-1 लागू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये पीक पंचनाम्यांच्या कामाला वेग आला आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत एकूण 1,339 गावांपैकी 789 गावांतील पंचनामे पूर्ण झाले असून गावांच्या संख्येच्या तुलनेत 58.92 टक्के पूर्तता झाली आहे. मात्र, या गावांतील प्रत्यक्ष क्षेत्रफळाचा विचार करता आतापर्यंत केवळ 19.73 टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. खातेदारांच्या तुलनेत ही पूर्तता 22.20 टक्के आहे.
जिल्ह्यात ट्रिगर-1 लागू झालेल्या इगतपुरी, पेठ, नांदगाव, मालेगाव, बागलाण, सिन्नर, सुरगाणा, येवला, देवळा आणि कळवण या दहा तालुक्यांमध्ये एकूण पाच लाख 92 हजार 616.43 हेक्टर क्षेत्र आहे. पाच लाख 60 हजार 960 खातेदार आहेत. त्यांपैकी आतापर्यंत एक लाख 16 हजार 901 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यात एक लाख 24 हजार 561 खातेदारांचा समावेश झाला आहे.
पंचनाम्यांच्या कामाचा दररोज आढावा घेतला जात आहे. उर्वरित गावांमधील काम पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. शेतकर्‍यांना मदत देण्याच्या प्रक्रियेसाठी पंचनामे महत्त्वाचे असल्याने क्षेत्रनिहाय कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

नांदगावची शंभर टक्के पूर्तता
गावांच्या संख्येच्या तुलनेत नांदगाव तालुका पंचनाम्यांमध्ये आघाडीवर असून, 100 पैकी 100 गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. सुरगाण्यात 191 पैकी 150, देवळ्यात 46 पैकी 35, सिन्नरमध्ये 131 पैकी 94 आणि कळवणमध्ये 152 पैकी 102 गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत.

एकूण पंचनामा स्थिती
♦ दहा तालुक्यांतील एकूण क्षेत्र- 5,92,616.43 हेक्टर
♦ पूर्ण झालेले पंचनामे- 1,16,901 हेक्टर
♦ क्षेत्रफळाच्या तुलनेतील पूर्तता- 19.73%
♦ एकूण खातेदार- 5,60,960
♦ पंचनाम्यात समाविष्ट खातेदार- 1,24,561
♦ खातेदारांच्या तुलनेतील पूर्तता- 22.20%
♦ एकूण गावे- 1,339
♦ पंचनामे पूर्ण झालेली गावे- 789
♦ गावांच्या तुलनेतील पूर्तता- 58.92 टक्के

तालुकानिहाय गावांची पूर्तता
तालुका      पूर्ण गावे      एकूण गावे        पूर्तता
नांदगाव       100             100          100%
सुरगाणा       150              191          78.53%
देवळा           35                46           76.09%
सिन्नर         94              131            71.76%
कळवण      102              152          67.11%
बागलाण     100              172          58.14%
इगतपुरी       65              126           51.59%
पेठ               64              146          43.84%
येवला           43              124          34.68%
मालेगाव       36               151          23.84%
जिल्हा         789           1,339        58.92%

Damage assessments completed for 58.92% of the 789 villages in the district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *