चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत; वर्षभरापासून फरार आरोपी जेरबंद

वडाळागाव : प्रतिनिधी
मुंबइ र्नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जाकिर अख्तर शेख (वय 45, रा. भद्रकाली पोलीस ठाण्यामागे, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 6.15 ते सायंकाळी पाचच्या दरम्यान फिर्यादी दशरथ मोतीराम ठाकरे (रा. म्हसरूळ, नाशिक) यांनी दुचाकी शताब्दी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याने मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना पोलीस अंमलदार नवनाथ उगले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीची मोटारसायकल भारतनगर परिसरात एका व्यक्तीकडे असल्याचे समोर आले. पथकाने भारतनगर येथे जाऊन जाकिर अख्तर शेख याला दुचाकीसह ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार दुसरी दुचाकीही हस्तगत करण्यात आली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ आदींच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित पवार, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक मुमताज शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक देविदास गाढवे, आदींसह पोलीस अंमलदार विजय म्हैसधुणे, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, अमित तिडके, समीर शेख, योगेश अपसुंदे, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, विशाल पाठक, भास्कर सदगीर, श्रीकांत कर्पे, प्रवीण जाधव, जुबेर सय्यद व महिला पोलीस अंमलदार दीपाली देशमुख आदींनी कारवाई केली.

Two stolen two-wheelers recovered; accused absconding for a year arrested.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *