आरोग्य हेच धन

आश्विन कृष्ण त्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून ओळखली जाते, साजरी केली जाते.. हिला धनत्रयोदशी म्हणतात. समुद्रमंथनातून 14 रत्न प्रगट झाली. त्यातील एक रत्न भगवान धन्वंतरी. भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य रक्षणासाठी भगवान धन्वंतरी प्रगट झाले. धन्वंतरी हे विष्णूचे अवतार मानले जातात. दीपावलीच्या चार दिवसांचा संबंध भगवान विष्णूशी दिसून येतो हेही ध्यानात येते. कामधेनूचे प्रगटीकरण ही समुद्रमंथनातून झाले. त्याला पूजन करण्याचा दिवस वसुबारस. दुसरा दिवस हा दुसर्‍या रत्नाचा भगवान धन्वंतरीचा..

धन म्हणजेच आरोग्य असे गेल्या तपापर्यंत विश्वात मानणारी मंडळी होती; परंतु गेल्या दशकात आरोग्य हेच धन असे बिंबले आहे. या दिवशी आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी, भूतलावरील पहिले चिकित्सक यांचा वाढदिवस आणि म्हणून धन्वंतरीची पूजा सर्व चिकित्सक वैद्य तर करतातच, पण सामान्य कुटुंब धन्वंतरीकडे आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना करतात. समस्त वैद्य त्यांना उत्तम चिकित्सा करण्यासाठी आशीर्वाद मागतात. धन्वंतरी आपल्या हातात चार आयुधे घेऊन अवतरले. एका हातात शंख आहे. त्याने आसमंतातील दुशित्ता शंखनादाने दूर होते. दुसर्‍या हातात सुदर्शन चक्र हे शल्यचिकित्सेचे प्रतीक आहे. तिसर्‍या हातात जलौका हा प्राणी आहे. जलौका अर्थात जळवा हा प्राणी अशुद्ध रक्त शोषून घेतो व आरोग्य देतो. आज जलौका ही लंडनमधील रॉयल कॉलेजमध्ये खूप कठीण प्लास्टिक सर्जरीमध्ये अवयव जोडण्यासाठी वापरतात (केवल माहितीसाठी). चौथ्या हातात अमृत कलश असून, ते औषधांचे प्रतीक आहे.असे धन्वंतरी भूतलावरील सर्व व्याधींचा विनाश करून पृथ्वीला आरोग्य देण्यासाठी अवतरले तो दिवस धनत्रयोदशी. धन म्हणजे आरोग्य हे हजारो वर्षांपूर्वी सांगितले आहे म्हणून त्यांची उपासन म्हणजे शरीररूपी धनाची उपासना करतात. धन्वंतरींना धने व लाह्या वाहतात हेही विशेष असून, शरद ऋतूतील आरोग्याशी त्याचा संबंध दिसतो.
धन्वंतरी जयंती विशेष नैवेद्यपूजनाच्या प्रसादामध्ये दुधाचा समावेश विशेष असून, शरीर व मनाच्या सात्त्विक गुणांची वाढ, धातूंची झीज भरून काढणार्‍या द्रव्यांचा समावेश करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद म्हणून देण्याची पद्धत संपूर्ण भारतात दिसून येते. धन्वंतरीला ‘क्षीरतिलावन’ या दुधाच्या प्रकारचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. खवा, साळीच्या लाह्या, बत्तासे, वेलची चारोळी, सुंठ व किंचित मिरी टाकून दुधामध्ये ते एकजीव करून मिश्रण तयार करावे व आवश्यकतेनुसार थोडावेळ गरम करावे. हा नैवेद्य धन्वंतरीला दाखवून तीर्थप्रसाद असे एकत्रित मिश्रण रूपाने सर्वांना द्यावे. या खिरीतील प्रत्येक द्रव्य शरीर धातूचे वर्धन करणारे असून, थंडीत वाढणारा वात कमी करून कफाचे स्थिरत्व करणारे व पित्तशमन करणारे आहे. मधुर रसाचे, स्निग्ध गुणाचे हे क्षीरतिलावन हृदयाला हितकर असून, धातुवर्धनाबरोबर तात्काळ तर्पण करणारे आहे. थंडीमध्ये वृष्य गुणांचे, शक्ती वाढवणारे, पचायला सोपे असणारा सकाळ व संध्याकाळी सेवन करण्याचा पदार्थ आहे. बाल, गर्भिणी, वृद्ध व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसाठी धन्वंतरीचा प्रसाद अमृततुल्यच म्हणावा लागेल.
धन्वंतरी जयंती हा एक सर्व विश्वातील चिकित्सकांना दिला जाणारा आशीर्वाद आहे. आज ही जयंती विविध देशांमध्ये साजरी करताना दिसते, कारण संपूर्ण विश्वाने या धन्वंतरी आयुधनमध्ये असलेली दिव्य शक्ती दिसली आहे. आज शंखनादाची गरज वाटत आहे म्हणून अमेरिकेमध्येसुद्धा कार्यक्रम, संवाद इत्यादीबरोबर विविध शालनमध्ये शंखनाद करण्याची प्रथा सुरू झाली आहे.आयुर्वेदाती शल्यचिकित्सा यावर संशोधन करीत आहेत. यापेक्षा आयुर्वेदाची महती काय वर्णावी. धन्वंतरी जयंतीला अनेक ब्राह्मण कुटुंब लक्ष्मीपूजन करतात व शरीर व धन अशा दोघांचीही उपासना करण्याची प्रथा दिसून येते, यानेच आपल्याला महत्त्व दिसून येते.
आजच्या दिवसाची विशेष पाककृती ही आरोग्याला पूरक असल्याने त्याचे सेवन आवर्जून करावे. हा नैवेद्य धन्वंतरीला दाखवून तसेच लक्ष्मीपूजनालाही करून त्याचे तीर्थप्रसाद रूपाने सर्वांना द्यावे.

धनत्रयोदशी प्रसाद विशेष दुग्ध पाककृती
दुधावर संस्कार करून त्यातून चवदार पदार्थ निर्माण करण्याची सद्यकालीन प्रथा प्राचीन ग्रंथात आढळते. देवाच्या पूजनाच्या प्रसादामध्ये दुधाचा समावेश विशेष असून, शरीर व मनाच्या सात्त्विक गुणांची वाढ धातूंची झीज भरून काढणार्‍या द्रव्यांचा समावेश करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद म्हणून देण्याची पद्धत संपूर्ण भारतात दिसून येते. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजनामध्ये साळीच्या लाह्या, बत्तासे, धने या द्रव्यांना ऋतुमानानुसार महत्त्व आहे. धन्वंतरीला ‘क्षीरतिलावन’ या दुधाच्या प्रकारचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. खवा, साळीच्या लाह्या, बत्तासे, वेलची, चारोळी, सुंठ व किंचित मिरी टाकून दुधामध्ये ते एकजीव करून मिश्रण तयार करावे व आवश्यकतेनुसार थोडावेळ गरम करावे.

Health is wealth.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *