घरगुती चवीसोबत वेळेचीही बचत
नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीच्या फराळाची लगबग सुरू झाली असून, चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे अशा पारंपरिक पदार्थांना बाजारपेठेत मागणी वाढू लागली आहे. नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन धावपळीमुळे घरच्या घरी फराळ तयार करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने अनेक कुटुंबांचा कल तयार फराळ खरेदीकडे वाढला आहे. घरगुती चव, स्वच्छता, दर्जा आणि आकर्षक पॅकिंग यामुळे तयार फराळाला पसंती मिळत आहे.
यंदा ग्राहकांकडून किलोच्या पॅकबरोबरच लहान पॅक, मिश्र फराळाचे संच आणि भेटवस्तू म्हणून देण्यासाठी विशेष पॅकची मागणी होत आहे. पारंपरिक पदार्थांसोबतच कमी तेलातील आणि वेगवेगळ्या चवींच्या पदार्थांनाही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
बाजारपेठेतील दरांमध्ये पदार्थानुसार फरक असून, काही ठिकाणी किलोमागे 320 ते 600 रुपयांपर्यंत दर आहेत. साजूक तुपातील पदार्थांचे दर यापेक्षा अधिक आहेत.
बदलता खरेदीचा कल
तयार फराळाच्या मिश्र संचांना पसंती.
लहान कुटुंबांसाठी अर्धा किलोचे पॅक.
भेटवस्तूंसाठी आकर्षक पॅकिंग.
पारंपरिक पदार्थांसोबत नावीन्यपूर्ण चवींची मागणी.
घरगुती फराळ बनवून देणार्या महिला बचत गटांना रोजगाराची संधी.
बदलत्या जीवनशैलीमुळे तयार फराळाला चांगली मागणी आहे. ग्राहकांना घरगुती चव, स्वच्छता आणि दर्जा महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे आम्ही ग्राहकांच्या आवडीनुसार विविध पदार्थ आणि फराळाचे संच उपलब्ध करून देत आहोत.
– वैशाली जाधव, व्यावसायिक
फराळाचे बाजारभाव (प्रतिकिलो)
पदार्थ दर
भाजणी चकली : 540
करंजी : 540
अनारसे : 540
गोड शंकरपाळे : 320
खारे शंकरपाळे : 320
पातळ पोहे चिवडा : 360
बुंदी लाडू : 400
बेसन लाडू : 400
साजूक तुपातील बेसन लाडू : 600
Demand for ready-made snacks (faral)