दोन हजारांची लाच घेताना सुरगाण्यात सेतू कर्मचारी जाळ्यात

दोन हजारांची लाच घेताना
सुरगाण्यात सेतू कर्मचारी जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
रेशनकार्ड स्वतंत्र करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना सेतू कर्मचार्‍यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सीताराम बनश्या पवार (35) रा. रानविहिर,पो. सतखांब, ता. सुरगाणा , नाशिक असे  या लाचखोर सेतू कर्मचार्‍याचे नाव आहे.
तक्रारदाराकडे  आरोपीने रेशनकार्ड स्वतंत्र करण्यासाठी प्रकरण दिले होेते. या लाचेची रक्कम सुरगाणा येथील  सेतू कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक
श्रीमती वैशाली पाटील, हवालदार शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, विलास निकम, अविनाश पवार यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा     घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जिल्ह्यात भूजलपातळी 1.60 मीटरने घटली

♦ 919 गावांना टंचाईची शक्यता ♦ येवल्यात सर्वाधिक घसरण ♦ उन्हाळ्यात 339 गावांना पाणीटंचाईचा धोका…

8 minutes ago

व्यसनांना नकार, राष्ट्रनिर्मितीला होकार!

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन नाशिक : प्रतिनिधी भारताच्या विकासासाठी तरुणांची ऊर्जा योग्य…

16 minutes ago

ध्वजारोहणानिमित्त गोदाघाट आकर्षक विद्युत रोषणाई

नाशिक : धर्मध्वज मिरवणूक व ध्वजारोहणानिमित्त गोदाघाट आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. (छाया :…

25 minutes ago

सिंहस्थ निर्विघ्न पार पडू दे

महापौरांचे गोदामातेला साकडे नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पाश्वभूमीवर सुरू असलेली कामे अंतिम…

39 minutes ago

महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे दिल्लीतून ठरते

राज ठाकरे : कर्जतच्या सभेत सरकारविरोधात आक्रमक; झाडे तोडलेली पाहून दु:ख कर्जत : प्रतिनिधी भीमाशंकर-कर्जत…

50 minutes ago

शेतकर्‍यांना सरसकट मदत नाहीच; जीआर जारी

33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांनाच मिळणार अग्रिम 5 हजार मुंबई : प्रतिनिधी दुष्काळामुळे त्रस्त शेतकर्‍यांना…

2 hours ago