पंतप्रधान मोदींची घोषणा; गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिन’
गडचिरोली :
आदिवासी समाजाने नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तसेच पीएम जनमन योजना आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानासाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक बजेटची तरतूद केल्याचे सांगून गडचिरोलीतील जनजातीय गौरव दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव केला.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त (दि. 15 नोव्हेंबर) यंदाचा देशस्तरीय ‘जनजातीय गौरव दिन’ महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत दिमाखात पार पडला. गडचिरोलीतील क्रीडासंकुलात आयोजित या मुख्य सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आदिवासीमंत्री जुएल ओराम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) झालेल्या या कार्यक्रमात देशभरातील आदिवासी भागांमधील विविध विकास सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, भगवान बिरसा मुंडा यांच्या ‘उलगुलान’ (क्रांती) आंदोलनापासून प्रेरणा घेत देशातून नक्षलवाद आणि माओवादाचे कंबरडे मोडल्याची मोठी घोषणा केली.
जागतिक बँकेच्या अहवालाचा दाखला देत, मागील 12 वर्षांत राबवलेल्या परिणामकारक योजनांमुळे देशातील पन्नास कोटी नागरिक गरिबीरेषेच्या बाहेर आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. एकेकाळी देशातील 125 जिल्हे नक्षलवादाने प्रभावित होते. मात्र, आता हा अंधार संपून विकासाचे युग सुरू झाले आहे. बस्तरमध्ये दिवाळी साजरी करणे ही या नव्या सुरुवातीचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त (जनजातीय गौरव दिन) पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (दि. 15) गडचिरोली येथून देशभरातील आदिवासी समुदायासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या 246 विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. पंतप्रधान या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. गडचिरोलीतील मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते.
गडचिरोली देशाच्या विकासाचे इंजिन : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकेकाळी नक्षलवादाच्या छायेत असलेला आणि संवेदनशील मानला जाणारा गडचिरोली जिल्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 100 टक्के नक्षलमुक्त झाला आहे. हा जिल्हा आता केवळ माओवादमुक्तच नव्हे, तर देशाची ‘स्टील सिटी’ म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे इंजिन बनण्यास सज्ज आहे. टंट्या मामा भिल्ल, राघोजी भांगरे, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांसारख्या विस्मृतीत गेलेल्या आदिवासी योद्ध्यांच्या बलिदानाचा सुवर्ण इतिहास पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर येत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
A budget of 1 lakh crore for tribal development
- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…
- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…
- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…
- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…
- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…
विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…