नाशिक

दुष्काळात बळीराजाला दिवाळी अग्रिमचा आधार

जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर पाच हजार

नाशिक : प्रतिनिधी
अनियमित पावसामुळे खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने दिवाळी अग्रिमचे वितरण केले आहे. नाशिक जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 4 लाख 47 हजार 43 शेतकर्‍यांच्या खात्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण 223 कोटी 52 लाख 15 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. 12 नोव्हेंबरअखेरची ही आकडेवारी असून, दिवाळीच्या पाश्वर्र्भूमीवर शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
नियमित दुष्काळी मदतीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी पाच हजार रुपयांचे अग्रिम अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तालुकानिहाय वितरणात मालेगाव तालुका आघाडीवर आहे. तेथील 72 हजार 6 शेतकर्‍यांना मदत मिळाली आहे. त्याखालोखाल निफाडमधील 55 हजार 246, बागलाणमधील 52 हजार 491, येवल्यातील 51 हजार 639 आणि सिन्नरमधील 47 हजार 710 शेतकर्‍यांचा समावेश आहे.
दुष्काळ निवारणासाठी आर्थिक मदतीबरोबरच जमीन महसुलात सूट, पीककर्ज पुनर्गठन, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेतून कामे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, अन्नधान्य वितरण आणि पशुधनासाठी चार्‍याचे नियोजन अशा उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी
तालुका लाभार्थी शेतकरी तालुका लाभार्थी शेतकरी
मालेगाव 72,006 निफाड 55,246
बागलाण 52,491 येवला 51,639
सिन्नर 47,710 चांदवड 38,129
नांदगाव 36,121 देवळा 22,642
कळवण 19,589 सुरगाणा 14,577
इगतपुरी 14,406 त्र्यंबकेश्वर 12,973
पेठ 9,514

निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेती व्यवसायासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. दुष्काळ कितीही मोठा असला, तरी शेतकर्‍यांनी खचून जाऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आर्थिक मदत, कर्जविषयक सवलती, पाणीपुरवठा, चारा, रोजगार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकर्‍यांचे हित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संरक्षण हेच उपाययोजनांचे केंद्रबिंदू आहेत. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

Diwali advance provides a lifeline to farmers amidst drought

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुंभमेळ्यात 10 हजार डॉक्टर देण्याची तयारी

हनुमान चालीसा केंद्रांच्या माध्यमातून 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा : डॉ. प्रवीण तोगडिया  नाशिकरोड : विशेष…

4 hours ago

सप्तशृंगगडावर दर्शनासाठी भाविकांची महागर्दी

दीपावली सुट्टीमुळे राज्यासह परराज्यातून भाविक गडावर दाखल सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी…

4 hours ago

सायबर फसवणुकीचे वाढते जाळे

आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट…

4 hours ago

नोटबंदीच्या शक्यतेची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा…

4 hours ago

दिवाळी संपताच सोन्याच्या दरात घसरण

ग्राहकांंची चांदी, आगामी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी संधी नाशिक : प्रतिनिधी दीपोत्सवाचा उत्सव संपताच देशांतर्गत आणि…

4 hours ago

राज्य नाट्य स्पर्धेला 16 पासून प्रारंभ

नाशिक केंद्रावर 23 नाट्य संस्थांचा सहभाग नाशिक : प्रतिनिधी दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर आता नाशिककर नाट्यरसिकांना…

5 hours ago