नाशिक

निरक्षरांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी अभियान

प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे जि.प. सीईओ ओमकार पवार यांचे आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यात निरक्षर व्यक्तींना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध जनजागृतिपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साक्षरता रॅली, साक्षरता शपथ, प्रभातफेरी, व्याख्याने, चर्चासत्रे, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा तसेच नवसाक्षरांचा सत्कार अशा उपक्रमांतून साक्षरतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबातील, नातेवाइकांमधील आणि परिसरातील 15 वर्षांवरील असाक्षर व्यक्तींची नोंदणी करून त्यांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले.
शिक्षणापासून वंचित व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि समाजात शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करणे हा या दिनाचा उद्देश आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची साक्षरता 74.31 टक्के होती. महिला साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासह शाळाबाह्य व्यक्ती आणि प्रौढांना मूलभूत शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मागील तीन वर्षांत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीअंतर्गत सन 2023-24 मध्ये 32 हजार 736 उद्दिष्टापैकी 24 हजार 982, सन 2024 25 मध्ये 29 हजार 724 उद्दिष्टापैकी 25 हजार 215, तर सन 2025-26 मध्ये 32 हजार 736 उद्दिष्टापैकी 35 हजार 79 असाक्षर व्यक्तींना परीक्षेस प्रविष्ट करण्यात आले. सन 2026-27 साठी 65 हजार 472 असाक्षर व्यक्तींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमातून 15 वर्षे व त्यावरील असाक्षरांना मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान, जीवनोपयोगी, डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेचे मार्गदर्शन दिले जात आहे. ग्रामपंचायती, शाळा, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहभागातून अभियान राबविले जात आहे. या उपक्रमाला चालना देताना ओमकार पवार यांनी स्वतः पुढाकार घेत सुमन वावळे या असाक्षर महिलेची नोंदणी केली. नागरिकांनी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून असाक्षर व्यक्तींची नोंदणी करावी. त्यानंतर शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयामार्फत आवश्यक नियोजन केले जाणार आहे. यासाठी शिक्षणाधिकारी (योजना) सरोज जगताप यांनी coschemenashik@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

साक्षरता ही केवळ वाचन-लेखनाची क्षमता नसून आत्मविश्वास, स्वावलंबन आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे प्रभावी साधन आहे. नागरिकांच्या सहभागातून नाशिक जिल्हा साक्षर व सक्षम करण्याचा संकल्प पूर्ण करूया,
– ओमकार पवार
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, नाशिक

A campaign to bring the illiterate into the fold of literacy.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago