देवळाली कॅम्प परिसरात अनोखी चोरी
सिडको : विशेष प्रतिनिधी
सध्याच्या युगात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंवा सोन्या-चांदीची चोरी सामान्य झाली असतानाच देवळाली कॅम्प परिसरात चक्क घोड्याचे खोगीर, पट्टा, लगाम आणि लोखंडी साखळी चोरीला गेल्याची घटना घडल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमाल सेनोटेरियम, लॅमरोड येथील शेतकरी आणि रिक्षाचालक आकाश सुरेश उन्हवने यांच्या शेतातील गोठ्यातून आठ हजार रुपये किमतीचे चामडी खोगीर व लगाम, तीन हजार रुपयांची लोखंडी साखळी आणि पाचशे रुपयांचा पट्टा, असा एकूण 11 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे, ही घटना आधुनिक साधनांवर नव्हे, तर पारंपरिक ग्रामीण घोड्याच्या साहित्यावर घडली आहे.
देवळाली कॅम्प पोलिसांनी गणेश ऊर्फ गौरव रमेश गारे (वय 20, रा. कोळीवाडा, संसरीगाव) याच्यावर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याआधीदेखील आरोपी विधिसंघर्षित बालक म्हणून एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांच्या नजरेत आला होता, अशी माहिती तपास अधिकार्यांनी दिली. या घटनेचा तपास वपोनि जयंत शिरसाठ व सपोउनिरी एस. एम. पानसरे करत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात घोड्याच्या सामानाचीही चोरी होऊ शकते, हे या घटनेमुळे पुन्हा सिद्ध झाले आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…