नाशिक

90 हजारांच्या शाळेच्या ड्रेसची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तयार आलेले सुमारे 90 हजार रुपये किमतीचे ड्रेस चोरट्याने चोरून नेल्याची घटना उंटवाडी येथील स्वामीकृपा रेसिडेन्सी परिसरात घडली आहे. या चोरीमुळे शाळा व्यवस्थापनासह संबंधित एजन्सीत खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद गंगाराम ठाकरे (रा. जगतापनगर, उंटवाडी) हे एज्युकेशन कौन्सिलर असून, त्यांच्या पत्नीच्या नावावर एसएसटी एन्टरप्रायजेस ही फर्म नोंदणीकृत आहे. सदर फर्मला निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्मची ऑर्डर मिळाली होती.
एकूण 242 विद्यार्थ्यांसाठी टी-शटर्र् व पँट असे 90 हजार 147 रुपये किमतीचे कपडे सफेद रंगाच्या तीन गोण्यांत भरून ठेवण्यात आले होते. हे साहित्य स्वामीकृपा रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये असलेल्या स्टोअररूममध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, 23 मे ते 4 जून 2025 या कालावधीत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने या गोण्या चोरून नेल्या.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संगम तपास करत आहेत.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago