नाशिक

सराफ बाजाराला सुवर्णझळाळी

नाशिक : प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा या मोठ्या सणाला ग्राहकांनी सोने खरेदी करीत सण साजरा केला. सोन्याचे दर काहीसे कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, दसर्‍याला सायंकाळी मोठी उलाढाल झाल्याचे चित्र होते. यंदा युद्धजन्य परिस्थिती,
फेडरल बँकेने व्याजदरात केलेली कपात या सर्वांचा परिणाम सोनेदरवाढीत झाला होता; परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पितृपक्षापासून सोने-चांदी दरात घट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या विजयादशमीला सोने-चांदी खरेदीला सुवर्णझळाळी मिळाली आहे.
लाइटवेट दागिन्यांना महिलांनी पसंती दिली, तर चोख चांदीच्या वस्तूची खरेदी मुहूर्तावर करण्यात आली.
राजेशाही हार, नेकलेस, बांगडी, कानातले, मंगळसूत्र, अंगठी, लहान मुलांचे दागिने आदींना मागणी असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
विजयादशमीला सोने दर 24 कॅरेटला 1 लाख 45 हजार प्रति दहा ग्रॅम, अधिक जीएसटी. 22 कॅरेटला 1 लाख 38 हजार 370 प्रति दहा ग्रॅम जीएसटीसह आणि चांदी 2 लाख 18 हजार प्रतिकिलो जीएसटीसह असे दर राहिले. दसर्‍याच्या मुहूर्तावर शहर आणि उपनगरांतील सराफ बाजारात चैतन्याचे वातावरण दिसून आले. दसर्‍याला सोने खरेदीस विशेष महत्त्व असल्याने मुहूर्तावर सोने-चांदी बाजार तेजीत आहे.
दसरा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दशमी तिथीला नवीन वस्तू, वाहन, घर, जमीन, सोने आदी खरेदी केलेली शुभ मानली जाते. खरेदीसाठी वा कोणत्याही शुभकार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते.
गतवर्षी सोन्याचा दर हा एक लाख 20 हजारांवर होता. जानेवारी 2026 मध्ये एक लाख 85 हजारांपर्यंत सोनेदराने उच्चांक गाठला होता. आगामी काळात सोनेदर दोन लाखपार जाण्याची शक्यता सराफ व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
दसर्‍याला चोख सोने, चांदी, नाणी गुंतवणूक म्हणून घेतली जातात. तसेच प्रत्येक वर्षाला एक कोणतीही वस्तू सोने खरेदी करण्याची हौस महिलेला असतेच. त्यामुळे मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. सणाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरांतील सराफ व्यावसायिकांनी घडणावळीवर, खरेदीवर विविध प्रकारच्या सूट देण्यात आल्या असल्याने ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

सोने दर : 24 कॅरेट 1 लाख 45 हजार अधिक जीएसटी
22 कॅरेट 1 लाख 38 हजार 370 प्रति 10 ग्रॅम जीएसटीसह
चांदी दर : 2 लाख 18 हजार प्रतिकिलो जीएसटीसह

गुंतवणूक आणि लग्नसराईसाठी आगाऊ बुकिंग करीत दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली. सोन्याची नाणी, वेढणी तसेच कमी वजनाच्या दागिन्यांची मागणी होती. आगामी काळात दरवाढ होऊ शकते. गुंतवणूक आणि सण, लग्नसराईनिमित्त दसर्‍याच्या मुहूर्तावर खरेदीस ग्राहकांनी पसंती दिली.
– गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोशिएशन

भविष्यात सोन्याचा भाव अडीच लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज.
सोन्याच्या वाढत्या भावामुळे खरेदी महागली असली, तरी सोने-चांदीकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहणार्‍या ग्राहकांचा कल कायम आहे. भविष्यात सोन्याचा भाव दोन ते अडीच लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष भाव जागतिक बाजारातील घडामोडींवर अवलंबून राहतील.
– मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार

विजयादशमीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी नाणी, बिस्कीट, वेढे, चोख सोने खरेदीला प्राधान्य दिले. दर दीड लाखाच्या आत आल्याने योग्य वेळी सोन्यातील गुंतवणूक आगामी काळात
फायदेशीर ठरणार आहे.
– चेतन राजापूरकर, अध्यक्ष, आयबीजेए

A Golden Glow for the Bullion Market

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago