नाशिक

दहशतवाद्यांशी संबंध आणि मनी लाँड्रिंगची भीती दाखवून 71 लाखांची फसवणूक

सिडको : प्रतिनिधी
काश्मीरमधील एका प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे तक्रारदाराचे आधारकार्ड आढळल्याचा बनाव करून सायबर भामट्यांनी एका व्यक्तीची 71 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराशी मोबाइल फोन, व्हॉट्सअ‍ॅप आणि सिग्नल अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. सीमा रॉय, विक्रम सिंग आणि राकेश अग्रवाल अशी नावे सांगणार्‍या व्यक्तींनी तक्रारदाराला संपर्क केला.
काश्मीरमधील जेके 9527 या प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे तक्रारदाराचे आधारकार्ड सापडले आहे. या आधारकार्डचा वापर करून तक्रारदाराच्या नावाने एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले असून, त्यातून 70 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचे भामट्यांनी सांगितले. या प्रकरणात तक्रारदाराची संपत्ती जप्त केली जाईल आणि त्यांना अटक होऊ शकते, अशी भीती दाखविण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराकडे असलेल्या पैशांची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरून तक्रारदाराने एकूण 71 लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. मात्र, हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या कार्यक्षेत्रात या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, अनोळखी व्यक्तींकडून पोलीस, तपास यंत्रणा किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगून पैशांची मागणी झाल्यास नागरिकांनी सावध राहावे. भीती दाखवून किंवा चौकशीच्या नावाखाली कोणत्याही अनोळखी बँक खात्यात पैसे जमा करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते.

Rs 71 lakh swindled by creating fear of links to terrorists and money laundering

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago