कृषी अधिकारी डमाळे यांचे आवाहन
नांदगाव : प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप पीकविमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी शेतकर्यांनी वेळेत पीकविमा भरणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यावा, असे आवाहन नांदगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे यांनी केले आहे.
तालुक्यात कांदा, मका, कपाशी, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असून, लागवड झालेल्या पिकांचा पीकविमा शेतकर्यांनी उतरून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दृष्टिक्षेपात…
पीक पेरणी झालेले क्षेत्र (हे.)
मका – 41,600
बाजरी – 6,220
तूर – 580
मूग – 2,460
उडीद – 116
भुईमूग – 1740
सोयाबीन – 400
कापूस – 6299
एकूण सरासरी क्षेत्र-
62,390 हेक्टर
पेरणी झालेले क्षेत्र-
59,700 हेक्टर
झालेला एकूण पाऊस –
223 मि. मी.
Farmers should avail the benefits of the Kharif crop insurance scheme.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…