घरातील नोकरांनीच मारला साडेतीन लाखाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

पंचवटी : प्रतिनिधी
घरात कामासाठी ठेवलेल्या नोकरांनीच घरातील सुमारे तीन लाख 58 हजार रुपयांच्या सोन्या -चांदीच्या दागिन्यांवर डल्लामारल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारुशीला विपुल लाठी (वय 40, रा. फ्लॅट क्रमांक 13, सी विंग, द इम्पेरियर, पाम शेल्स रिसॉटशेजारी दत्तमंदिर चौक, गंगापूररोड) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दि. 19 मे रोजी रात्री 8 ते दि. 26 रोजी 11 वाजेच्या सुमारास फ्लॅट क्र. 13 सी विंग, द इम्पेरियर, पाम शेल्स रिसॉटशेजारी दत्तमंदिर चौक, गंगापूररोड येथे घरकाम करणारे नोकर रोहित बेलदार व त्याची पत्नी कोमल चौधरी-बेलदार यांनी बेडरूममधील लाकडी कपाटातील बंद लॉकर व त्याखालील ड्रॉव्हर लपवून ठेवलेल्या चावीने उघडले. त्यातून पांढर्‍या रंगाची चेन असलेल्या पाउचमधील सोन्याची चेन, सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, सोन्याची अंगठी. त्यात सफेद रंगाचे खडे व एक हिरा असलेली, सोन्याचे कडे, त्यात 0.800 कॅरेटचा हिरा, कानातील टॉप्स जोड, सोन्याचे कानातील टॉप्स जोड, सोन्याचे कानातील टॉप्स जोड, सोन्याची चेन, सोन्याची वेढणी, सोन्याचे पान, असे एकूण तीन लाख 58 हजार रुपयांचे दागदागिने चोरून नेले आहेत. याबाबत रोहित बेलदार (वय 24), कोमल चौधरी बेलदार (वय 21, रा. अजनाड बंगला, अजनाद, भाटपुरा, जि. धुळे) यांच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश शिंदे करत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

The house servants themselves stole gold and silver ornaments worth three and a half lakhs.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *