नाशिक

दुचाकी वाहनांसाठी सोमवारपासून आरटीओत नवीन मालिका

पंचवटी : प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे दुचाकी वाहनांसाठी (एमएच 15-एलडी) ही नवीन मालिका सोमवार(दि. 23 नोव्हेंबर)पासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक
प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले यांनी दिली. आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज 23 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 ते 2.30 वाजेपर्यंत या कार्यालयाच्या आवक-जावक कक्ष क्रमांक विभागात जमा करणे अनिवार्य राहील. एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत बदलून किंवा रद्द करता येणार नाही. राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍या व्यक्ती/संस्थेच्या नावे हस्तांतरित होणार नाही. भरलेले शासकीय शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल. ज्या अर्जदारांचा आकर्षक क्रमांक लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल, अशा अर्जदारांनी लिलावात भाग घेण्यासाठी दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 पर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी कोणत्याही बोलीच्या रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा.

New series for two-wheelers to begin at the RTO from Monday

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जिल्हात 1,177 ठिकाणी होणार नविन आपले सरकार सेवा केंद्रे

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात ग्रामपंचायत क्षेत्रात 1,159, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात 18 ठिकाणी नवीन आपले…

7 minutes ago

गाडी बाजूला घेण्याच्या वादातून एकावर हल्ला

अंबड लिंकरोडवर चौघांनी केली मारहाण सिडको : प्रतिनिधी वाहन बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अशोक…

23 minutes ago

फळविक्रीचा गाडा सुरू ठेवण्यासाठी मागितली खंडणी

चाकूहल्ल्यात विक्रेता जखमी सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील मेहेरधाम बसथांब्याजवळ फळविक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दोघांनी…

58 minutes ago

पंचवटीत महाविद्यालयीन युवकाची निघृण हत्या

पूवर्र्वैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचवटी : प्रतिनिधी शहरातील पंचवटी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा डोके…

1 hour ago

पंजाबच्या निर्णयाअभावी रखडला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार?

सर्व मंत्र्यांसोबत साडेतीन तास मंथनानंतर मोदी-शहा-नितीन नवीन यांच्यात दीड तास बैठक नवी दिल्ली । प्रतिनिधी…

1 hour ago

प्रशिक्षणासाठी जाणार्‍या प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

रुग्णालयातून परतणार्‍या सहकार्‍यांचाही अपघात नांदगाव : प्रतिनिधी वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी येणार्‍या प्राध्यापकाचा हृदयविकारा-च्या तीव्र…

1 hour ago