नाशिक

सुपीक जमिनींवर महापारेषणचे टॉवर

सारोळे खुर्दमधील शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप

निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे महापारेषण व महावितरणच्या वीजवाहिनी प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर उंच टॉवर उभारण्याचे काम सुरू असून, या कामामुळे अनेक अल्पभूधारक शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यालगतच्या सुपीक आणि भविष्यात व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार्‍या शेतजमिनींवर टॉवर उभारले जात असल्याचा आरोप बाधित शेतकर्‍यांनी केला आहे.
बाधित शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदार व काही अधिकारी शेतकर्‍यांची संमती न घेता अथवा त्यांच्याशी सविस्तर चर्चा न करता टॉवरचे नियोजन करत आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी शासकीय पडीक जमीन उपलब्ध असतानाही खासगी शेतकर्‍यांच्या जमिनींची निवड करण्यात येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, रस्त्यालगतची जमीन भविष्यात गोदाम, कृषी सेवा केंद्र, प्रक्रिया उद्योग किंवा अन्य पूरक व्यवसाय उभारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. मात्र, अशा ठिकाणी विजेचे टॉवर उभारल्यास त्या जमिनीचा व्यावसायिक विकास कायमस्वरूपी खुंटतो. त्यामुळे भविष्यातील उत्पन्नाच्या संधी हिरावल्या
जात असून, अल्पभूधारक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना, अशा प्रकारचे नियोजन त्याच्या अडचणीत आणखी भर घालत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. ग्रामपंचायतींच्या पातळीवरही शेतकर्‍यांना विश्वासात न घेता प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदार संवाद साधण्याऐवजी कायद्याची भाषा वापरून दबाव आणत असल्याचाही दावा काही बाधित शेतकर्‍यांनी केला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा प्रशासन, महापारेषण, महावितरण तसेच लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात आणि शेतकर्‍यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण निफाड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Mahatransco towers on fertile land

शेतकर्‍यांना विश्वासात न घेता प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago