नाशिक

शिर्डीला निघालेल्या साईभक्तांवर काळाचा घाला टळला

इगतपुरीत स्लॅब कोसळून चार महिलांसह 17 जण जखमी, रात्री साडेदहाची दुर्घटना

इगतपुरी : प्रतिनिधी
मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी येथील साई निवारा परिसरात मुक्कामी थांबलेल्या साईभक्तांवर स्लॅबचा काही भाग अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी (दि. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ठाणे जिल्ह्यातील वाशिंद (ता. शहापूर) येथील 17 साईभक्त जखमी झाले आहेत. सुदैवाने कोसळलेला स्लॅब थेट साईबाबांच्या पालखीवर पडल्याने खाली विश्रांती घेत असलेल्या भाविकांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.
वाशिंद व शहापूर परिसरातील साईभक्तांंचा समूह पायी पालखी सोहळ्यासह शिर्डीच्या दर्शनासाठी निघाला होता. प्रवासादरम्यान या भाविकांनी इगतपुरी येथील साई निवारा येथे भोजन केले. जेवण आटोपल्यानंतर सर्व भाविक विश्रांती घेत असतानाच रात्री साडेदहाच्या सुमारास इमारतीच्या स्लॅबचे गर्डर आणि फरशा अचानक खाली कोसळल्या. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सुरुवातीला सात ते आठ भाविक जखमी झाल्याचे समोर आले होते; मात्र उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा आकडा 17 वर पोहोचला. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. दोन भाविकांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने, तर तिघांना फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित 12 जखमींवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती
स्थिर आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा शालिनी खातळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, इगतपुरी पोलीस आणि टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ढिगार्‍याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे वाशिंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

या दुर्घटनेमुळे साई निवारा येथील बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कसारा घाटात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नैसर्गिक दरीत (व्हॅली) कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी दिली जात नाही. असे असतानाही कोणतीही अधिकृत परवानगी न घेता या व्हॅली परिसरात पाच ते सात मजली इमारतींचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे या घटनेनिमित्ताने उघड
झाले आहे.

अनधिकृत रिसॉर्ट, बंगल्यांवर कारवाई कधी?

इगतपुरी परिसर व नगरपरिषद हद्दीत शेकडो बंगले आणि रिसॉर्ट मालकांनी कोणतीही परवानगी न घेता पावसाचे पाणी वाहून जाणार्‍या दरीच्या भागात बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. पर्यटकांकडून मोठी रक्कम आकारून हे व्हिला आणि बंगले 24 तासांसाठी भाड्याने दिले जातात. या धोकादायक बांधकामांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या अनधिकृत बंगले व व्हिलांवर इगतपुरी नगरपरिषद प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

A tragedy was averted for Sai devotees on their way to Shirdi.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कसबे वणी-नाशिक रस्त्यावर अपघातात एक ठार, सहा जखमी

ओझरखेड धरणाजवळ थार-अर्टिगाची धडक दिंडोरी : प्रतिनिधी कसबे वणी- नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्यापुढील हॉटेल…

30 minutes ago

चांदीची चमक उतरली! भाव वर्षातील नीचांकी पातळीवर

जानेवारीच्या विक्रमी उच्चांकावरून 61 टक्क्यांची घसरण; 1980 व 2011 मधील उच्चांकही मागे मुंबई : प्रतिनिधी…

36 minutes ago

राज्यात थंडीचा कडाका, ढगाळ हवामान

‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली मुंबई : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरातील मध्य-दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर निर्माण…

50 minutes ago

नवे पीक येऊनही कांदा स्वस्त होईना

देशभरातील आवकेत 24 टक्के घट; किरकोळ भाव 60 रुपये किलोवर नवी दिल्ली/नाशिक : प्रतिनिधी कांद्याचे…

1 hour ago

बाळासाहेबांच्या फोटोवरून राजकीय रणकंदन

शायना एनसींच्या कृतीवर ठाकरे गट, काँग्रेसचा संताप; भाजपकडूनही माफीची मागणी, शिंदेंकडून मात्र पाठराखण! मुंबई :…

1 hour ago

एक होती सुखद वनराई

- सुजाता येवले फळबियांच्या शोधात वृक्षावृक्षांत धावत होती, डोळ्यात आसवे आणत होती. दुरवर गेलेल्या सहचरांना…

21 hours ago