नाशिक

कसबे वणी-नाशिक रस्त्यावर अपघातात एक ठार, सहा जखमी

ओझरखेड धरणाजवळ थार-अर्टिगाची धडक

दिंडोरी : प्रतिनिधी
कसबे वणी- नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्यापुढील हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी (दि. 17) रात्री साडेदहाच्या सुमारास थार आणि अर्टिगा मोटारीची समोरासमोर भीषण धडक झाली. या दुर्घटनेत अर्टिगा चालक सुनील अरुण शिंदे यांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, थार (एमएच 15 जेएच 8882) नाशिकच्या दिशेने, तर अर्टिगा (एमएच 15 केयू 1205) वणीच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की, त्यांच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना उपचारासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला आणि वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात अजय पाटील, दिनेश पाटील, काजल पाटील, भावेश पाटील, शिवसागर शिंदे आणि यश पाटील हे सहा जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण वरखेडा येथील रहिवासी असून, अर्टिगा मोटारीतून प्रवास करत होते. दरम्यान, थार गाडीत नेमके किती प्रवासी होते आणि जखमींना पुढील उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे, याबाबतची अधिक माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

One killed, six injured in an accident on the Kasbe Vani-Nashik road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शिर्डीला निघालेल्या साईभक्तांवर काळाचा घाला टळला

इगतपुरीत स्लॅब कोसळून चार महिलांसह 17 जण जखमी, रात्री साडेदहाची दुर्घटना इगतपुरी : प्रतिनिधी मुंबई-नाशिक…

16 minutes ago

चांदीची चमक उतरली! भाव वर्षातील नीचांकी पातळीवर

जानेवारीच्या विक्रमी उच्चांकावरून 61 टक्क्यांची घसरण; 1980 व 2011 मधील उच्चांकही मागे मुंबई : प्रतिनिधी…

31 minutes ago

राज्यात थंडीचा कडाका, ढगाळ हवामान

‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली मुंबई : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरातील मध्य-दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर निर्माण…

44 minutes ago

नवे पीक येऊनही कांदा स्वस्त होईना

देशभरातील आवकेत 24 टक्के घट; किरकोळ भाव 60 रुपये किलोवर नवी दिल्ली/नाशिक : प्रतिनिधी कांद्याचे…

54 minutes ago

बाळासाहेबांच्या फोटोवरून राजकीय रणकंदन

शायना एनसींच्या कृतीवर ठाकरे गट, काँग्रेसचा संताप; भाजपकडूनही माफीची मागणी, शिंदेंकडून मात्र पाठराखण! मुंबई :…

1 hour ago

एक होती सुखद वनराई

- सुजाता येवले फळबियांच्या शोधात वृक्षावृक्षांत धावत होती, डोळ्यात आसवे आणत होती. दुरवर गेलेल्या सहचरांना…

21 hours ago